AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नाथाभाऊंच्या जावयाचा फॉरेन्सिक अहवाल समोर, प्रांजल खेवलकर प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट

काही दिवसांपूर्वी खराडीमध्ये सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा मारला होता, या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती, या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे.

मोठी बातमी! नाथाभाऊंच्या जावयाचा फॉरेन्सिक अहवाल समोर, प्रांजल खेवलकर प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2025 | 2:56 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या खराडी भागामध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता, या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे, खेवलकर प्रकरणात या फॉरेन्सिक अहवालामुळे मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याचं या अहवालातून स्पष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.

खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेलवकर आणि इतर सहा जणांना अटक करण्यात आली होती, आणि अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले होते. काही दिवसांपूर्वी हे फॉरेन्सिकचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले आहेत, आणि त्या रिपोर्टमध्ये कोणत्याही आरोपींनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याची माहिती समोर आली आहे. आणि तेच रिपोर्ट आता पोलिसांनी चार्जसीटमध्ये देखील दिलेले आहेत, तेच रिपोर्ट आता न्यायालयात देखील सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया 

मी आधीचपासूनच सांगत होतो. खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्सचं सेवन केलेलं नाहीये, सात जणांची रेव्ह पार्टी होऊ शकत नाही. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना गुन्हे दाखल आहेत, असं दाखवण्यात आलं. शेवटी पोलीस म्हणाले ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, या सगळ्या गोष्टी पाहाता हा एक रचलेला कट आहे, असं वाटतं, असं खडसे यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटलं आहे. दरम्यान  तुमचा रोख कोणावर आहे, असा प्रश्नही यावेळी एकनाथ खडसे यांना विचारण्यात आला, यावर बोलणं त्यांनी टाळलं, मला काहीही सांगायची गरज नाही, जनतेला सर्व माहीत आहे, असं खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच आता या प्रकरणात काही राहिलं नाही,  आम्ही न्यायालयात लढू असं खडसे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...