AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर एसीबीचा छापा , दिलीप खेडकर यांच्या घराची झाडाझडती

माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील निवासस्थानी एसीबीने छापा टाकला. नाशिक आणि अहिल्यानगर एसीबी पथकांनी विविध ठिकाणी एकाचवेळी कारवाई करत खेडकर दाम्पत्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पूजा खेडकरचे वडील असलेल्या दिलीप खेडकर यांच्या घराची झाडाझडती सुरू असून महत्त्वाची कागदपत्रे तपासली जात आहेत.

पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर एसीबीचा छापा , दिलीप खेडकर यांच्या घराची झाडाझडती
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 9:33 PM
Share

कुणाल जायकर, रिपोर्टर : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी छापा टाकला. नाशिक आणि अहिल्यानगर एसीबीच्या पथकांनी एकाचवेळी विविध ठिकाणी ही कारवाई केल्याने पाथर्डी तालुक्यात एकच खळबळ उडाली.. पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील निवासस्थानी पहाटेपासून झाडाझडती सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध सुमारे 13 कोटी 30 लाख रुपयांच्या बेहिशोबी मालमत्ता आणि खर्चाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. याच प्रकरणाच्या पुढील तपासाचा भाग म्हणून एसीबीच्या पथकांकडून खेडकर यांच्या भालगाव येथील निवासस्थानी झाडाझडती आणि चौकशी करण्यात येत आहे.

या कारवाईसाठी नाशिक आणि अहिल्यानगर येथील एसीबीची पथके तैनात करण्यात आली असून ३० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईत सहभागी झाल्याची माहिती आहे. पथकांकडून खेडकर यांच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांच्या नोंदी, उत्पन्नाचे स्रोत तसेच स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती तपासली जात आहे.

एसीबीच्या तपासात 1995 ते 2023 या कालावधीत मिळालेले उत्पन्न, केलेला खर्च आणि या कालावधीत संपादित करण्यात आलेल्या मालमत्तेची पडताळणी केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत मालमत्ता आणि खर्च यामध्ये मोठी तफावत आढळल्याच्या आरोपांच्या अनुषंगाने ही चौकशी सुरू आहे, असं समजतं.

उघड चौकशीदरम्यान ज्ञात उत्पन्नापेक्षा 102 टक्के अधिक बेहिशोबी मालमत्ता संपादित केल्याचा आरोप असून, यासंदर्भात खेडकर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मालमत्तेचे स्रोत, आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची एसीबीकडून सखोल तपासणी केली जात आहे.

विविध ठिकाणी एकाचवेळी कारवाई

मंगळवारी पहाटे एसीबीच्या पथकांनी एकाचवेळी विविध ठिकाणी कारवाई सुरू केली. भालगाव येथील निवासस्थानी अधिकारी दाखल झाल्यानंतर घरातील कागदपत्रे आणि आर्थिक नोंदींची तपासणी करण्यात येत आहे. तपासादरम्यान कोणती महत्त्वाची कागदपत्रे किंवा माहिती एसीबीच्या हाती लागली, याबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.

दिलीप खेडकर हे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील आहेत. पूजा खेडकर प्रकरणामुळे खेडकर कुटुंब यापूर्वी चर्चेत आलं होतं. आता  एसीबीने केलेल्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा खेडकर कुटुंब पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप