AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार यांना थेट पक्षातूनच आव्हान, थेट नोटीस, प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया..

Praful Patel On Sunetra Pawar : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पक्षातूनच आव्हान देण्यात आले. थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवण्यात आली. त्यावर आता प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली.

सुनेत्रा पवार यांना थेट पक्षातूनच आव्हान, थेट नोटीस, प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया..
Sunetra Pawar and Praful Patel
| Updated on: Jul 14, 2026 | 11:00 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पक्षातूनच मोठे आव्हान मिळाले. थेट नोटीसच पाठवण्यात आली. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी ही नोटीस पाठवली आहे. सुनेत्रा पवार यांची झालेली अध्यक्षपदाची निवड ही घटनेला धरून नसल्याचे त्या पत्रात म्हटले, ज्याने मोठी खळबळ उडाली. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. थेट वकिलांकडून ही नोटीस पाठवण्यात आली. यासोबतच अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, असेही त्यात म्हणण्यात आले. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सर्व धूरा आपल्या हातात घेतली. मात्र, आता त्यांना पक्षातूनच आव्हान मिळताना दिसतंय. यावर सुनेत्रा पवार नक्की काय भूमिका घेतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

यादरम्यानच आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली. सुनेत्रा पवार यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसचा आणि माझा काहीच संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांची निवड घटनेला धरूनच झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढणे गरजेचे असल्याचे माझे मत होते.

माझ्या मताचा आणि या नोटीसचा काहीच संबंध नाही. ते माझे वैयक्तीक मत आहे. पक्षांतर्गत काही सुधारणा करणे गरजेचे असल्याचेही प्रफुल पटेल यांनी म्हटले. प्रफुल पटेल यांनी पक्षांतर्गत काही सुधारणा झाल्या पाहिजे, असे म्हटले होते. मात्र, या नोटीसचा आणि आपला काहीच संबंध नसल्याचेही त्यांनी यादरम्यान स्पष्ट केले.

अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. अजित पवार यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर पवार कुटुंबातील वादही पुढे आले. शरद पवार यांना अजित पवार यांच्या निधनानंतर कोणतीही कल्पना न देताच सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईला आल्या आणि त्यांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले की, आपल्याला याबाबत कोणतीही कल्पना नाही.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक