AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राजक्ता माळीसाठी मनसे नेता धावला, म्हणाले “सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात…”

भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्या नावाचा गैरवापर केल्यामुळे प्राजक्ता यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी धस यांच्यावर टीका केली आहे आणि प्राजक्तांना पाठिंबा दिला आहे. धस यांनी वाल्मिकी कराडच्या इव्हेंट मॅनेजमेंटचा उल्लेख करताना प्राजक्तासह इतर अभिनेत्रींची नावे घेतली होती. प्राजक्ता आज पत्रकार परिषद घेणार आहेत.

प्राजक्ता माळीसाठी मनसे नेता धावला, म्हणाले सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात...
prajakta mali
| Updated on: Dec 28, 2024 | 10:37 AM
Share

बीडमध्ये वाल्मिक कराड याच्याकडून होणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंटची माहिती देताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंधाना यांचं नाव घेतलं होतं. त्यामुळे प्राजक्ता माळी संतापली आहे. प्राजक्ताने या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण तापण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच मनसेचा एक बडा नेता प्राजक्ताच्या समर्थनार्थ धावला आहे. मनसेच्या नेत्याने ट्विट करत सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करून प्राजक्ता माळीचं समर्थन करतानाच आमदार सुरेश धस यांना कानपिचक्या दिल्या आहेत. “सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारं आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत”, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्राजक्ता भूमिका मांडणार

दरम्यान, सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने नावाचा उल्लेख केला, त्या पार्श्वभूमीवर प्राजक्ता माळी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे. प्राजक्ता माळीने धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे प्राजक्ता आधी महिला आयोगात तक्रार करून पत्रकार परिषद घेणार की पत्रकार परिषदेनंतर तक्रार करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच प्राजक्ता काय बोलणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले होते धस?

परळीत इव्हेंट मॅनेजमेंट खूप केलं जातं. वाल्मिकी कराडला या इव्हेंट मॅनजमेंटची मोठी हौस आहे. सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याच प्रसार करावा, असा उपरोधिक टोला धस यांनी लगावला होता. त्यामुळे प्राजक्ता माळी या संतापल्या असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच एखाद्या गंभीर प्रकरणाच्यावेळी काहीही संबंध नसताना कलाकारांची नावे घेणं कितपत योग्य आहे? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...