लक्ष्मण मानेंच्या आरोपांवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा पर्याय म्हणून पुढे आलेल्या वंचित बहुजन आघाडीत मोठी बंडखोरी झाली आहे. यानंतर प्रकाश आंबेडकरांनी लक्ष्मण माने आमचे नेते असून राजीनामा स्वीकारणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

लक्ष्मण मानेंच्या आरोपांवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jul 04, 2019 | 5:35 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा पर्याय म्हणून पुढे आलेल्या वंचित बहुजन आघाडीत मोठी बंडखोरी झाली आहे. वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांना लक्ष्य करत वंचितचा राजीनामा दिला. यानंतर प्रकाश आंबेडकरांनी लक्ष्मण माने आमचे नेते असून राजीनामा स्वीकारणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

माने यांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच प्रकाश आंबडेकरांनी आपली भूमिका स्पष्ट करत हा वाद पक्षांतर्गतच सोडवला जाणार असल्याचे स्पष्ट केले. आंबेडकर म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीत अनेक समाजाचे प्रतिनिधी आहेत. वंचित बहुजन आघाडीत भटका विमुक्त समाज, बंजारा समाज, माळी समाज, धनगर समाज, आदिवासी, व्हीजेएनटी (VJNT), एससी (SC) आणि एसटी (ST) असे अनेक समाज आहेत. काही ठिकाणी संघर्ष होणार हे आम्हाला माहिती होते. वंचित आघाडी उभी करण्यात लक्ष्मण माने पुढे होते याची आम्हाला जाणीव आहे. ते आजही वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. ते वंचितचेच नेते राहतील असे मी जाहीर करतो.”

वंचित आघाडी उभी करण्यात अनेकांचे योगदान आहे. त्यामुळे लक्ष्मण माने यांचा राजीनामा मी कसा स्वीकारणार? असा प्रश्नही आंबेडकरांनी विचारला. तसेच मानेच्या राजीनाम्यावर मी नाही तर वंचित आघाडी निर्णय घेईल, असेही सांगितले. पत्रकारांनी विचारलेल्या अधिक प्रश्नांवर प्रकाश आंबेडकरांनी अधिक बोलण्यास नकार दिला आणि माने वंचितचे नेते असल्याचेही जाहीर केले.

लक्ष्मण माने काय म्हणाले?

“वंचित बहुजन आघाडी मी सुरु केली होती आणि आता यापुढे मीच तिला पुढे नेणार असंही माने यावेळी म्हणाले. वंचित आघाडी हा आमचा गरिबांचा पक्ष होता. या पक्षाचं नेतृत्त्व आम्ही बाळासाहेबांकडे दिले. बाबासाहेबांचे नातू आहेत म्हणून बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्याकडे नेतृत्व दिलं. बाबासाहेबांच्या प्रेमापोटी आम्ही श्रद्धेने त्यांच्यासोबत गेलो. मी ईश्वर मानत नाही, कोणाच्या पायाला हात लावत नाही पण बाळासाहेब त्याला अपवाद आहेत. बाबासाहेबांना आम्ही पाहिलं नाही, पण बाळासाहेबांना पाहिलं. त्यांच्याबद्दल आम्हाला श्रद्धा आहे. त्या भावनेने आम्ही त्यांच्याकडे गेलो. पण आमचा एकही माणूस निवडून आला नाही. 70 वर्षात भटक्या विमुक्तांचा एकही प्रतिनिधी संसदेत गेला नाही.

माझ्यामुळे सेना-भाजपला 10-12 जागा गेल्या

वंचित बहुजन आघाडीचं मोठं नुकसान झालं. आम्ही सत्तेसाठी त्यांच्यासोबत गेलो. पण ते काही झालं नाही. सत्ता एकट्याच्या बळावर येत नाही त्यामुळे बाळासाहेबांसोबत गेलो. आमची ताकद दाखवली. दहा-बारा जागा येतील असं वाटत होतं, पण एकही जागा आली नाही. जागा आल्या भलत्यांच्याच. ज्यांना मी आयुष्यात मदत केली नाही त्या शिवसेना-भाजप आणि प्रतिगाम्यांना दहा-बारा जागा माझ्यामुळे गेल्या, असं मला वाटतंय. आयुष्यात मी असं कधी केलं नाही, त्यामुळे असं कसं झालं याचं मला दु:ख होतंय. यावेळी माझी चूक झाली. वंचित बहुजन आघाडीमध्ये मी गेलो त्यामुळे ती चूक झाली. आरएसएस-भाजपला माझ्यामुळे मदत झाली, त्यामुळे त्यांच्या 10-12 जागा निवडून आल्या. आमची एकही आली नाही. काँग्रेसच्या किती पडल्या आणि दुसऱ्यांच्या किती आल्या यात मला इंटरेस्ट नाही. त्यांच्या जागा पडल्या या त्यांच्या कर्माने पडल्या.

प्रकाश आंबेडकरांवर नाराज

प्रकाश आंबेडकरांचा स्वभाव, कामाची पद्धत लोकशाहीवादी नाही. मी गेल्या वर्षभरात हे अनुभवलं आहे. मोकळेपणाने काम करता येत नाही. घुसमट होतेय. त्यामुळे इथे राहण्यात अर्थ नाही, असं लक्ष्मण माने म्हणाले.

त्यांच्या कामाच्या पद्धती आहेत त्याचा विचार त्यांनी करायला हवा. आपल्याला जे काही करायचं आहे ते सर्वांनी मिळून करावं ही भूमिका लोकसभा निवडणुकीनंतर राहिली नाही. त्यामुळे समाज तुटत गेला. गैरसमज वाढत गेला. आता थांबण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे मी राजीनामा पाठवून दिला, असं लक्ष्मण माने यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....