Prakash Ambedkar: शेतकरीच नालायक, तोंडात मारून घेतली पाहिजे, दुष्काळावर बोलताना प्रकाश आंबेडकरांचं विधान!

Prakash Ambedkar Statement: शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या तुपकरांना मतदानच नाही. प्रकाश आंबेडकरांनी शेतकऱ्यांना सुनावलं आहे. यामुळे आता त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

Prakash Ambedkar: शेतकरीच नालायक, तोंडात मारून घेतली पाहिजे, दुष्काळावर बोलताना प्रकाश आंबेडकरांचं विधान!
| Updated on: Oct 25, 2026 | 8:15 PM

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शेतकऱ्यांबद्दल एक वक्तव्य केले आहे. ते आता चर्चेत आले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ते म्हणाले की. दुष्काळ आहे, पण शासनाने काहीच नियोजन केलं नाही. अल निनो येणार असल्याचे माहिती असताना अन्नधान्य, पाणी, चारा सह शेतकऱ्यांची निराशा सुद्धा झाली, असं त्यांनी सांगितलं. तसेच नंतर त्यांनी रविकांत तुपकरांचा उल्लेख करत शेतकऱ्यांना सुनावलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अस्मानी संकटाला तोंड कसं देणार याचा आराखडा सुद्धा तयार नाही. अकोल्याच्या सभेत बोलल्यानंतर एका मंत्र्याला जाग आली आणि पाणी जपून वापरा म्हटलं. सर्वसामान्य माणसाला सांगतो जर का यांनी अन्नधान्य चारा पाणी पुरवलं नाही तर सरकार मधल्या मंत्री आमदार खासदार पदाधिकारी यांच्या घरासमोर लाईन लावा, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

Loading...

ते म्हणाले की, महाराष्ट्रभर झाडांची कत्तल चालली आहे. यात नवीन काही नाही. देवाच्या नावानं ज्यांनी मदत मागितली त्यांच्यावरच आता चाल करायची वेळ आली. लोकांनी कायदा हातात घ्यायला शिकले पाहिजे. शिक्षक मतदारसंघामध्ये पाचही उमेदवारांनी पाच-पाच हजार रुपये खर्च केले. हे 15 कोटी आले कुठून? इन्कम टॅक्स यांच्या पाठी लागणार आहे का नाही? ईडी लागणार आहे का नाही? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बीजेपी आणि आरएसएस मतदान मागायला आले तर तू जेवण आणि पाणी दे असं सांगा. लोकांनी ही मानसिकता तयार झाली पाहिजे. जे आत्महत्या करत आहेत त्या कुटुंबाला पुढाऱ्यांनी भेटायला जाता कामा नये. या मताचा मी झालो आहे. तुम्हाला कोणी सांगितलं आत्महत्या करायला. मरायचं असेल तर दहा-बारा पुढार्‍यांना मारा आणि मरा.

ते म्हणाले की, शेतकरीच नालायक आहे त्याला काय करणार. मतदारच वाईट वाटतं बोलताना. जे शेतकऱ्यांसाठी लढत आहेत. शेतकऱ्यांनी तोंडात मारून घेतली पाहिजे की तुपकर आपल्यासाठी लढतो आहे. आपण त्यालाच मतदान केलं नाही. कालच्या झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील मास्तर म्हणण्याऐवजी त्यांना आता 5000 म्हणलं पाहिजे. त्याच्या अर्धांगिनीला पैठणी म्हटलं पाहिजे. विद्यार्थ्यांना म्हणणार आहे की तुम्ही त्याला मास्तर म्हणू नका पाच हजार म्हणा, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us