AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोपीनाथ मुंडेंचा वारसा, फक्त आणि फक्त माझी पंकू ताई… प्रकाश महाजनांची पोस्ट चर्चेत

गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदारावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे हेच खरे वारसदार असल्याचे म्हटले, तर प्रकाश महाजन यांनी पंकजा मुंडेंना पाठिंबा दिला. छगन भुजबळांनीही धनंजय मुंडेंनाच वारसदार ठरवले होते.

गोपीनाथ मुंडेंचा वारसा, फक्त आणि फक्त माझी पंकू ताई... प्रकाश महाजनांची पोस्ट चर्चेत
| Updated on: Oct 23, 2025 | 1:00 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार कोण यावरुन सातत्याने चर्चा सुरु आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांच्यावर टीका करणाऱ्या करुणा मुंडे शर्मा यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. राजकारणात पोटचा नव्हे तर विचारांचा वारसा असतो. हे धनंजय मुंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारस धनंजय मुंडे हेच आहेत, असे विधान करुणा शर्मा यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. आता यावर मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश महाजन यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत फेसबुकवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी करुणा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारसदार पंकजा मुंडे आहेत, असे विधान प्रकाश महाजन यांनी केले आहे.

प्रकाश महाजन काय म्हणाले?

क्या जमाना आ गया, स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारस कोण ठरवत आहे, एक भ्रष्टाचारी कारागृहात बरेच महिने काढून आलेला आणि दुसरी जी रोज उठून आपल्याच कुंकवाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगते. स्वर्गीय मुंडे साहेब यांचा वारसा मग तो सामाजिक असो किंवा राजकीय असो, फक्त आणि फक्त माझी पंकू ताई , दुसरे कोणी नाई, असे प्रकाश महाजन म्हणाले.

दरम्यान बीडमधील ओबीसींच्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस धनंजय मुंडे हेच आहेत. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी त्यांनी काम करावे, असे म्हटले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्यात. त्यातच याच विषयावरून करूणा मुंडे यांनी भाष्य करत चक्क धनंजय मुंडे यांचे कौतुक केले. त्यांच्या राजकीय संघर्षाचे आपण साक्षीदार आहोत, 2009 ते 2019 दरम्यान, धनंजय मुंडे यांनी जो संघर्ष केला, त्यात मी ही होते, असे करूणा मुंडे म्हणाल्या.

खरा राजकीय वारस हे धनंजय मुंडेच

छगन भुजबळ यांनी 100 टक्के सत्य सांगितलं आहे. राजकारणामध्ये पोटचा वारसा नसून तो विचारांचा वारसा असतो आणि आज ते धनंजय मुंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. घरामध्ये वाद झाला होता, मात्र धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंसारखच तळागाळामध्ये जाऊन स्वत:चे व्यक्तित्व निर्माण केलं. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा खरा राजकीय वारस हे धनंजय मुंडेच आहेत आणि त्यांची सून म्हणून मी सुद्धा. धनंजय मुंडे यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं, असेही करूणा मुंडे यांनी म्हटले.

पंकजा मुंडेंना हरवण्यामध्ये भाजपाचा हात होता. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचं खच्चीकरण झालं. त्यावेळी पंकजाताई डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी एक भाऊ म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. यानंतर दोघा बहीण भावांनी एकत्र मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे यांचा आणि माझा काही वाद नाही, त्यांच्या वृत्तीचा आणि माझा वाद आहे, असेही करुणा मुंडेंनी म्हटले होते. त्यातच आता प्रकाश महाजन यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...