सिंधुदुर्गात 22 जुलैपर्यंत मनाई आदेश जारी

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 37(1) (3) नुसार जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केलेत. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशातही असे म्हटले आहे.

सिंधुदुर्गात 22 जुलैपर्यंत मनाई आदेश जारी
Sindhudurg Prohibition order
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 12:06 AM

सिंधुदुर्गः नारायण राणेंना केंद्रात मिळालेलं मंत्रिपद आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 22 जुलै 2021 रोजीपर्यंत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मनाई आदेश जारी केलेत. सिंधुदुर्गातील परिस्थिती बिघडू नये या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 37(1) (3) नुसार जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केलेत. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशातही असे म्हटले आहे. (Prohibition order issued in Sindhudurg till 22 July 2021 )

लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येणार नाहीत

कलम 37 (1) नुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू बाळगण्यात मनाई करण्यात आली आहे. तसेच अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे इत्यादी गोष्टींना प्रतिबंध घालण्यात आला असून, असे कोणीही करताना आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

मिरवणुका काढणे व सभा घेणे या कृत्यास मनाई

व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखाविली जाण्याची शक्यता असते.) सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे, कलम 37 (3) नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5 अगर पाचांहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे या कृत्यास मनाई करण्यात आली आहे. हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते, ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस अधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही.

…तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील

या कालावधीत मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

संबंधित बातम्या

एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या पदरी मृत्यू, हीच का उपकाराची परतफेड? राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Prohibition order issued in Sindhudurg till 22 July 2021
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.