भंडारा रुग्णालयात बाळ दगावलेल्या मातांचं मानसरोग तज्ज्ञांकडून काऊन्सलिंग – यशोमती ठाकूर

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:25 PM, 11 Jan 2021

भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 8 जानेवारीच्या मध्य रात्री 2 वाजे दरम्यान एसएससीयु कक्षात लागलेल्या आगीमुळे 10 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अशात मृत मुलांच्या सर्व मातांना मानस रोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून धीर देण्याचं काम सुरू असल्याची माहिती महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. (psychiatrists Counseling to mother who loss baby in Bhandara Hospital fire accident Yashomati Thakur)

या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली असून अहवाल प्राप्त होताच जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मी स्वतः एक आई आहे. त्यामुळे या 10 मातांवर झालेला अपमान मी सहन करून घेणार नाही असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणाकडे गांभीर्याने बघत असल्याची माहितीही महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेमुळे रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेबाबत काही प्रश्न उपस्थित होत आहेत.

1. भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील 10 बाळांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

2. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग कशी लागली?

3. दुर्घटनेवेळी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी काय करत होते? SNIC युनिटमध्ये त्यावेळी कुणी उपस्थित नव्हतं का?

4. सरकारी रुग्णालयातील निष्काळजीपणा, उपचार यंत्रणा आणि आरोग्य उपकरणांमधील त्रुटी याला जबाबदार आहेत का?

5. प्राथमिक दृष्ट्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सरकारी रुग्णालयातील उपकरण आणि वायरिंगची वेळोवेळी तपासणी केली जात नाही का?

6. सरकारी पातळीवरुन या घटनेची दखल घेऊन, या दुर्दैवी घटनेला जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई केली जाणार का?

7. राज्य सरकारकडून मृत बालकांच्या नातेवाईकांना मदत दिली जाणार का? आणि किती मदत मिळणार?

8. अशा दुर्दैवी घटना घडल्यानंतर पाहणीच्या सोपस्काराव्यतिरिक्त आरोग्य विभाग काय उपाययोजना करणार?

9. पुढील काळात सरकारी रुग्णालयांमध्ये अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी आरोग्य विभाग काय खबरदारी घेणार?

10. रुग्णालयातील दुर्घटनेची पाहणी करुन, मृत बालकांच्या नातेवाईकांना दिलासा देऊन, आरोग्य यंत्रणेतील त्रुटीकडे दुर्लक्ष कसं करणार?

आरोग्यमंत्र्यांकडून दुर्घटनेची माहिती

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य रुग्णांना दुसरीकडे हलवण्याचे आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. (psychiatrists Counseling to mother who loss baby in Bhandara Hospital fire accident Yashomati Thakur)

संबंधित बातम्या :

भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह

BREAKING | भंडाऱ्यात देश हादरवणारी घटना, सरकारी रुग्णालयात आग, 10 बाळं दगावली

 

(psychiatrists Counseling to mother who loss baby in Bhandara Hospital fire accident Yashomati Thakur)