AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आर्थिक दुर्बल व्यक्तींसाठी मोफत लसीकरण, लतादीदींकडून कौतुक

खासगी रुग्णालयांमध्ये 600 ते 1 हजार 200 रुपये दर आकारुन लस दिली जात आहे. मात्र आर्थिक दुर्बल घटकांना ते परवडणारे नाही.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आर्थिक दुर्बल व्यक्तींसाठी मोफत लसीकरण, लतादीदींकडून कौतुक
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आर्थिक दुर्बल व्यक्तींसाठी मोफत लसीकरण
sagar joshi
sagar joshi | Updated on: May 25, 2021 | 7:39 PM
Share

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कोरोना लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. मात्र, लशींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळेपुणे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला दर 2 दिवसांनी ब्रेक लागतोय. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मात्र खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लसीकरण सुरू झाले आहे. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये 600 ते 1 हजार 200 रुपये दर आकारुन लस दिली जात आहे. मात्र आर्थिक दुर्बल घटकांना ते परवडणारे नाही. त्यामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आर्थिक दुर्बल व्यक्तींचं मोफत लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतलीय. (Corona vaccine will be given free of cost at Dinanath Mangeshkar Hospital)

खासगी रुग्णालयांना 630 रुपयांत लसीचा एक डोस केंद्र सरकारकडून उपलब्ध होत आहे. त्यात अधिक आकारणी करून साधारण 900 रुपयांपर्यंत एक डोस घेता येणार आहे. मात्र 900 रुपये प्रति डोस किंमत देण्याइतकी आर्थिक स्थिती नसलेल्या रिक्षाचालक, घरकाम करणारे कर्मचारी, फेरीवाले, भाजी आणि फळ विक्रेत्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मोफत लस दिली जाणार आहे. यासाठी कोणतीही कागदपत्र देण्याची गरज नाही. 45 वर्षांपुढील व्यक्तीला नोंदणी न करता आणि 18 ते 44 वर्षांच्या व्यक्तीला कोवीन अॅपवर नोंदणी करून मोफत लस मिळणार आहे.

गानसम्राज्ञी लता मंगशेकर यांच्याकडून कौतुक

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सुरु केलेल्या मोहिमेचं गानसम्राज्ञी लता मंगशेकर यांनी कौतुक केलं आहे. अशाप्रकारे मोफत कोरोना लस देणारे मंगेशकर रुग्णालय हे राज्यातील पहिलं रुग्णालय ठरलं आहे. या रुग्णालयात दिवसाला 100 ते 200 डोस मोफत दिले जाणार आहेत. इतरांना लस देऊन मिळणाऱ्या पैशातच या लसींची खरेदी होणार आहे. मंगेशकर रुग्णालयाला या उपक्रमातून एक रुपयाही मिळणार नाही. सरकारी रुग्णालयात देण्यात येणाऱ्या लसींचा तुटवडा लक्षात घेता अनेक नागरिक खासगी रुग्णालयात लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र इच्छा असूनही परिस्थिती अभावी ज्यांना लस घेता येत नाही अशांसाठी रुग्णालयाने हाती घेतलेल्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

लसीच्या दरनिश्चितीसाठी महापौरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे शहरातील काही खासगी रूग्णालयांमार्फत सध्या कोरोना लसीकरण सुरु आहे. या ठिकाणी वेगवेगळे दर आकारले जात आहेत. शिवाय हे दर 1 हजार 200 रुपयांपर्यंत आकारले जात आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयाकडून होणाऱ्या लसीकरणासाठी समान दर आकारले जावे, अशी मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

संबंधित बातम्या :

मस्तच! पुणे सावरलं, कोरोना रिकव्हरी रेट 96 टक्क्यावर; ‘ही’ त्रिसूत्री ठरली वरदान!

Home Isolation ban : फ्लॅट, बंगल्यात राहणारे लोक कोव्हिड सेंटरला कसे येतील? पुण्याच्या महापौरांचा प्रश्न

Corona vaccine will be given free of cost at Dinanath Mangeshkar Hospital

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली