AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासगी रुग्णालयातील लसीकरणाचे दर निश्चित करा, पुण्याच्या महापौरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

खासगी रुग्णालयाकडून होणाऱ्या लसीकरणासाठी समान दर आकारले जावे, अशी मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

खासगी रुग्णालयातील लसीकरणाचे दर निश्चित करा, पुण्याच्या महापौरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: May 25, 2021 | 7:07 PM
Share

पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कोरोना लसीकरणावर भर दिलाय. अशावेळी पुणे शहरातील काही खासगी रूग्णालयांमार्फत सध्या कोरोना लसीकरण सुरु आहे. या ठिकाणी वेगवेगळे दर आकारले जात आहेत. शिवाय हे दर 1 हजार 200 रुपयांपर्यंत आकारले जात आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयाकडून होणाऱ्या लसीकरणासाठी समान दर आकारले जावे, अशी मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (Equalization of Corona vaccination rates in private hospitals)

पुणे शहरात कोरोना आजाराचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आज अखेर शासनाकडून येणार्‍या प्रत्येक नियमांचे पालन करून रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात यश आले आहे. आजच्या स्थितीला शहरात पहिला आणि दुसरा डोस मिळून 10 लाख नागरिकांचे लसीकरण केलं आहे. मात्र महिनाभरात अनेक वेळा शासनाकडून पुणे शहराला लस उपलब्ध न झाल्यानं, अनेक वेळा लसीकरण बंद ठेवावं लागलं. यामुळे नागरिकांच्या रोषाला महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधीना सामोरं जावं लागल्याचं मुरलीधर मोहोळ म्हणाले.

‘खासगी रुग्णालयांच्या लसीकरणासाठी एकसमान दर हवे’

दरम्यान, आता पुन्हा लसीकरण सुरू झाले आहे. काही खासगी रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी 600 रुपयांपासून 1 हजार 200 रुपयांपर्यंत दर आकारत आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या लसीकरणासाठी एकसमान दर आकारले जावे, अशी मागणी त्यांनी केलीय.

‘खासगी रुग्णालयांकडून होणारे लसीकरण हे महापालिकेच्या यंत्रणेला मदत करणारेच आहे. खासगी केंद्रांनाही व्यवस्थापन आणि वैद्यकीय खर्च यासाठी लागत आहे. ही बाजूही आपण समजून घेत आहोत. खासगी रुग्णालयांचेही नुकसान होऊ नये आणि नागरिकांनाही दरांबाबत त्रास होऊ नये, ही आपली भूमिका असल्याचं मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलंय.

होम आयसोलेशनच्या निर्णयाला विरोध

राज्य सरकारने होम आयसोलेशन अर्थात गृहविलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध केला आहे. “राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी होम आयसोलेशन बंद करून रुग्णांना कोव्हिड सेंटरमध्ये उपचार देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र पुण्यातील लाट ओसरतीये असा निर्णय घेणं अव्यवहार्य आहे”, असा टोला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लगावला.

राज्य सरकारने पुणे शहरात रुग्णसंख्या कमी होत असताना असा निर्णय कसा घेतला?, अशी विचारणा मुरलीधर मोहोळ यांनी केली. राज्य सरकारने निर्णय घेतला असेल तर त्याचं आम्हाला पालन करावं लागेल. पण फ्लॅट, बंगलो, मोठ्या इमारतीत राहणारे लोक कोव्हिड सेंटरमध्ये कसे राहतील? त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO: आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती; राजेश टोपेंची मोठी माहिती

Home Isolation ban : फ्लॅट, बंगल्यात राहणारे लोक कोव्हिड सेंटरला कसे येतील? पुण्याच्या महापौरांचा प्रश्न

Equalization of Corona vaccination rates in private hospitals

कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.