AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे हादरलं! बायकोचा खून, मुलावर थेट चाकूने…माजी सैनिकाने पाडला रक्ताचा सडा, स्वत:लाही दिली भयंकर शिक्षा!

पुण्यातील राजगुरुनगर येथे माजी सैनिक महेंद्र दौंडकरने पत्नीची हत्या करून मुलावर हल्ला केला होता. बहिणीशी बोलत नसल्याच्या रागातून ही भयानक घटना घडली. त्यानंतर महेंद्रने भीमा नदीकाठी आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली

पुणे हादरलं! बायकोचा खून, मुलावर थेट चाकूने...माजी सैनिकाने पाडला रक्ताचा सडा, स्वत:लाही दिली भयंकर शिक्षा!
Punce Crime shook the city
| Updated on: Sep 02, 2026 | 5:29 PM
Share

पुण्यात दोन दिवसांपूर्वी अत्यंत भयानक घटना घडली होती. बहिणीशी बोलत नाही या रागातून एक माजी सैनिकाने त्याच्याच कुटुंबियांवर हल्ला चढवत पत्नीचा खून केला. एवढंच नव्हे तर त्यान त्याचा पोटच्या मुलावरही चाकूने हल्ला केला होता. या घटनेने माजलेली दहशत अद्याप कमी झालेली नसतानाच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीला संपवणाऱ्या आणि मुलावर हल्ला करणाऱ्या त्या आरोपीनेही टोकाचं पाऊलच उचलत आपलं आयुष्य संपवलं. महेंद्र दौंडकर असं आरोपीचं नाव असून त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत महेंद्र याचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ माजली. दौंडकर कुटुंबाच्या अशा दु:खद अंताने प्रचंड खळबळ माजली असून परिसरात अजूनही दहशतीचे, भीतीचे वातावरण आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार,माजी सैनिक महेंद्र दौंडकर याने त्याच्या राहत्या घरात पत्नी दीपा हिचा गळा आवळून खून केला होता. तसेच 17 वर्षांच्या मुलावरही चाकूने हल्ला केला होता. 30 ऑगस्टच्या रात्रीच्या सुमारास राजगुरूनगर येथे ही दुर्दैवी घटना घडली. दिपा महेंद्र दौंडकर( वय 40) असं मृत महिलेचं नाव असून पतीनेच तिची हत्या केली. याप्रकरणी आरोपीचा मुलगा अथर्व ( वय 17) यानेच फिर्याद दिली.

त्याच्या सांगण्यानुसार, रविवार 30 ऑगस्टच्या रात्री ही दुर्दैवी घटना घडली. पत्नी दीपा ही आपल्या बहिणीशी बोलत नाही याचा आरोपी महेंद्र याला प्रचंड राग आला होता. त्याच मुद्यावरून झालेल्या वादनंतर महेंद्र यांनी दीपाचा गळा आवळून खून केला.

अथर्व हा त्याच्या आईला उठवण्यासाठी गेला, तेव्हा तिचा मृत्यू झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यावेळी आरोपी महेंद्रने मुलगा अथर्व याच्यावरही चाकू हल्ला केला असा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. याचदरम्यान, घटनेनंतर महेंद्र दौंडकर हा बेपत्ता होता. खेड पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला .

नदीकाठी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

आरोपीचा कसून शोध घेतला जात होता, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विविध पथकंही पाठवली होती. मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. मात्र त्याचा शोध घेतला जात असतानाच आज सकाळी चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी महेंद्रचा मृतदेह आढळून आला. नदीकाठी एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी पाठछवला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता