AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला खुश ठेवलंस तर… बॉसने मर्यादा ओलांडल्या; विमा कंपनीतील धक्कादायक प्रकाराने पुणे हादरले

पुण्यात एका नामांकित विमा कंपनीत महिला कर्मचाऱ्याचा एरिया मॅनेजरने लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामाच्या निमित्ताने लोणावळ्याला नेऊन अश्लील वक्तव्ये, जवळीक साधण्याचा प्रयत्न आणि 'बॉसला खुश ठेवा' म्हणत धमक्या दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. हिंजवडी पोलिसांत बॉसवर गुन्हा दाखल झाला आहे.

मला खुश ठेवलंस तर... बॉसने मर्यादा ओलांडल्या; विमा कंपनीतील धक्कादायक प्रकाराने पुणे हादरले
बॉसने महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याचा आरोप
| Updated on: Jun 05, 2026 | 12:30 PM
Share

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवण करायला जायच्या निमित्ताने महिला कर्मचाऱ्याला लोणावळ्याला नेऊन तिचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नामांकित विमा कंपनीत हा प्रकार घडला आहे. या महिला कर्मचाऱ्याने आपल्या एरिया मॅनेजरवर लैंगिक छळ, अश्लील वक्तव्ये, जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न आणि नोकरीतून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 मधील कलम 74, 75, 78 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला कंपनीमध्ये सीनियर असोसिएट म्हणून कार्यरत असून विमा कंपनीच्या हिंजवडी आणि वाकड शाखांमध्ये विमा व्यवसायाचे काम पाहते. या महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत धक्कादायक माहिती दिली आहे. जानेवारी 2026 मध्ये हिंजवडी शाखेत रुजू झाल्यानंतर संशयित आरोपी आणि कंपनीचा एरिया मॅनेजर मोहम्मद सादिक हा वारंवार वैयक्तिक संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. कामाच्या संदर्भात तिने टीम लीडरकडे रिपोर्ट करणे अपेक्षित असतानाही सादिक वारंवार फोन करून माझ्याकडून रिपोर्ट घेत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

चर्चेला बोलावलं…

तक्रारीनुसार, हिंजवडी शाखा घरापासून लांब असल्याने तिने भोसरी शाखेत बदली मिळू शकते का? याबाबत सादिक यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर 19 मे 2026 रोजी व्यवसायातील कामगिरीबाबत चर्चा करण्यासाठी तिला औंध येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयात बोलावण्यात आले. चर्चा संपल्यानंतर रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास ती बसची वाट पाहत उभी असताना सादिक हा कार घेऊन तेथे आला आणि घरी सोडण्याचा आग्रह केला.

मला नाराज करणाऱ्यांना…

महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने नकार दिल्यानंतरही तिला कारमध्ये बसण्यास भाग पाडण्यात आले. प्रवासादरम्यान सादिक यांनी तिच्याशी सूचक आणि अश्लील स्वरूपाचे संभाषण केले. “आपल्या दोघांमध्ये काही झाले तरी कोणाला कळणार नाही”, “मला नाराज करणाऱ्याला मी सिस्टीममधून बाहेर काढतो” अशा प्रकारची वक्तव्ये केल्याचा आरोप तिने केला आहे. कार लॉक असल्याने मध्ये उतरता आले नाही, असेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. घरी सोडताना “ही गोष्ट कोणाला सांगू नकोस, अन्यथा तुझ्यासाठी चांगले होणार नाही” अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हात हातात घेतला

यानंतर 29 मे रोजी सादिक यांनी ग्राहकाला भेटायचे असल्याचे सांगून तिला सोबत येण्यास सांगितले. तक्रारीनुसार, हिंजवडीहून दोघे लोणावळा महामार्गावरील एका ढाब्यावर गेले. प्रवासादरम्यान सादिकने “कॉर्पोरेट क्षेत्रात बॉसला कसे खुश ठेवायचे हे माहीत असले पाहिजे, तू मला खुश ठेवलेस तर तुला पैशांची चिंता करावी लागणार नाही,” असे वक्तव्य केल्याचा आरोप तिने केला आहे. याचवेळी त्यांनी तिचा हात जबरदस्तीने हातात घेतल्याचेही महिलेने म्हटले आहे.

तू खूप बोअरिंग…

ढाब्यावर पोहोचल्यानंतर सादिक यांनी तिला ड्रिंक घेण्याचा आग्रह केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तिने नकार दिल्यानंतर “तू खूप बोअरिंग मुलगी आहेस” असे म्हणत लोणावळ्यात ट्रेकिंगला जाऊ, जंगलात एकांतात फिरू आणि मजा करू, अशा प्रकारचे प्रस्ताव दिल्याचा आरोप आहे.या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने तत्काळ आपल्या मावसभावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कंपनीतील इतर अधिकाऱ्यांपर्यंतही ही माहिती पोहोचली. कुटुंबीयांना प्रकार समजल्याचे लक्षात आल्यानंतर सादिकने तिला तातडीने परत पुण्यात आणल्याचा दावा करण्यात आला आहे.

परतीच्या प्रवासात “अशा गोष्टी घरच्यांना सांगायच्या नसतात. जर तू कोणाला काही सांगितले तर तुला कंपनीत काम करू देणार नाही आणि कुठेही नोकरी करण्याच्या लायकीची ठेवणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्याच दिवशी ती आपल्या भावांसह कंपनीच्या कार्यालयात गेली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. कंपनीकडून अंतर्गत चौकशीचे आश्वासन देण्यात आले; मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने अखेर तिने हिंजवडी पोलिस ठाण्यात धाव घेत कायदेशीर तक्रार दाखल केली.

तपास सुरू

या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. दरम्यान, तक्रारीतील आरोपांवर मोहम्मद सादिक किंवा संबंधित कंपनीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मोहम्मद ऊर्फ जाफर सय्यद असे अटक करण्यात आलेल्या आरोपी व्यवस्थापकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिला कर्मचाऱ्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सय्यद हा कामाच्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळीही महिलेला फोन करून अशोभनीय व वैयक्तिक संभाषण करत असे. तसेच, तो पीडितेला जेवणाच्या बहाण्याने लोणावळा येथे घेऊन गेला होता. तिथे त्याने पीडितेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला होता. दरम्यान पीडित महिलेच्या तक्रारीवरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी मोहम्मद ऊर्फ जाफर सय्यद याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Follow Us
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?