AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात मोठा राडा; आमदार सुनिल शेळके यांच्याकडून RTI कार्यकर्त्याला मारहाण? जिल्हाधिकारी कार्यालयात काय घडलं?

Sunil shelke vs sunil gujar : पुण्यात मोठा राडा झाला आहे. आमदार सुनिल शेळके यांच्याकडून RTI कार्यकर्ते सुनील गुजर यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पुण्यात मोठा राडा; आमदार सुनिल शेळके यांच्याकडून RTI कार्यकर्त्याला मारहाण? जिल्हाधिकारी कार्यालयात काय घडलं?
sunil shelke newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 17, 2026 | 8:24 AM
Share

पुण्यातून मोठी बातमी हाती आली आहे. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि मावळमधील आरटीआय कार्यकर्ते सुनिल गुजर यांच्यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा राडा झाला. दोघांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आयटीआय कार्यकर्ते गुजर यांनी आमदार शेळके यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. तर आमदार शेळके यांनी आरटीआय कार्यकर्ते गुजर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे. या घटनेने पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आमदार सुनील शेळके हे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी दुपारी तीनच्या सुमारास पोहोचले. त्यावेळी कार्यालयात आरटीआय कार्यकर्ते सुनील गुजर देखील होते. त्यानंतर आमदार शेळके यांनी गुजर यांना एका खोलीन नेलं. पुढे गुजर यांच्याकडील बॅग ओढून तपासणी केली. त्यांच्या बॅगेत शेळके नावाशी संबंधित कागदपत्र आढळल्याचा दावा आमदाराने केला. त्यानंतर आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याचा आरोप गुजर यांनी केला. बॅग ओढून एका खोलीत नेलं. त्यानंतर बॅग तपासली. शेळके यांच्यासहित त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा गुजर यांचा आरोप आहे.

आमदार शेळकेंचा नेमका आरोप काय?

सुनील गजर हे वर्षभरापासून पाळत ठेवत असल्याचा आरोप शेळके यांनी केलाय. आरटीआयच्या माध्यमातून माझ्याविषयी माहिती मिळवली जात आहे. त्यानंतर ही माहिती विरोधक आणि गुन्हेगारांना पुरवत असल्याचा आरोप शेळके यांनी केला. दुसऱ्याच्या नावाने आरटीआय अर्ज करून माझ्या नावाशी संबंधित कागदपत्रे मिळवत असल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे.

तत्पूर्वी, तक्रारीनंतर पुणे पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. पोलिसांच्या दाव्यानुसार, गुजर यांना एका खोलीत नेण्यात आलं. या फुटेजमध्ये शेळकेंनी सुनील गुजर यांना कोणताही केल्याचे दिसून आलेले नाही. मात्र, खोलीत मारहाण झाल्याचा आरोप गुजर यांनी केला. परंतु या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नव्हता. त्यामुळे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात सुनील गुजर यांना मारहाण केल्याचा पुरावा मिळाला नसल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा