AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शर्ट फाडला, भर रस्त्यात मारामारी अन्… पुण्यात शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?

पुण्याच्या वडगाव शेरी मतदारसंघात आमदार बापू पठारे आणि बंडू खांदवे यांच्यात लोहगाव येथे धक्काबुक्की झाली. स्थानिक रस्त्यांच्या कामांवरून झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर झटापटीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.

शर्ट फाडला, भर रस्त्यात मारामारी अन्... पुण्यात शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
पुण्यात राष्ट्रवादीत मोठा राडा
| Updated on: Oct 05, 2025 | 8:06 AM
Share

पुण्याच्या वडगाव शेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांना काल रात्री उशिरा पुण्यातील लोहगाव परिसरात धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले बंडू खांदवे यांच्याकडून ही धक्काबुक्की झाल्याचा आरोप आमदार पठारे यांच्या समर्थकांनी केला आहे. या दोघांमध्ये स्थानिक मुद्द्यांवरून शा‍ब्दिक वाद सुरु झाला. यानंतर या शाब्दिक वादाचे रूपांतर झटापटीत झाले. ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमकं काय घडलं?

लोहगाव परिसरात माजी सैनिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. आमदार बापू पठारे आणि लोहगाव ग्रामपंचायतचे माजी सभापती बंडू खांदवे यांच्यात स्थानिक रस्त्यांच्या कामांवरून शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर धक्काबुक्की, झटापटीमध्ये झाले.

बंडू खांदवे काय म्हणाले?

या घटनेबाबत बोलताना बंडू खांदवे यांनी आरोप केला की, “आमचे आंदोलन प्रशासनाविरुद्ध होते, पण आमदार पठारे यांनी तो विषय स्वतःकडे ओढावून घेत शाब्दिक वाद घातला. या झटापटीत आमदारांच्या तीन-चार सुरक्षारक्षकांनी माझा शर्ट फाडला आणि मला मारहाण केली.”

बापू पठारे काय म्हणाले?

तर दुसरीकडे, आमदार बापू पठारे यांनी खांदवे यांचा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले, “येथील रस्त्यांसाठी डिसेंबर २०२३ मध्ये ३१ कोटी रुपये मंजूर झाले होते, मग २०२४ पर्यंत ते कोणी अडवले? रस्त्यांवर पाण्याच्या आणि ड्रेनेजच्या लाईन्स नव्हत्या, नागरिकांनी त्या जोडल्या नव्हत्या. मग रस्ते करायचे कसे? राजकारण म्हणून आंदोलन करायचे का? ५ वर्षांमध्ये ते सत्तेत होते तेव्हा आर पी (DP) रस्ते का केले नाहीत, कुणी अडवले होते? खोटं राजकारण करू नका, जनता माफ करणार नाही.”

यावरुन रस्त्याच्या कामांवरून लोहगाव परिसरात अनेक दिवसांपासून स्थानिक आमदार आणि इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरु असल्याचे दिसत आहे. याच वादाचा भाग म्हणून या भागात आंदोलन देखील नियोजित करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमधील या झटापटीमुळे लोहगाव परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.

पाहा व्हिडीओ :

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...