AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे महापालिकेतील नोकरीचं स्वप्न जास्त वेळ टिकलं नाही, उमेदवारांची मॉडर्न स्टाइल कॉपी, तपासातून धक्कादायक माहिती उघड, चष्मा…

पुणे महापालिकेच्या भरती प्रक्रियेत कॉपी करणाऱ्या तिघांचं नोकरीचं स्वप्न जास्त वेळ टिकलं नाही. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

पुणे महापालिकेतील नोकरीचं स्वप्न जास्त वेळ टिकलं नाही, उमेदवारांची मॉडर्न स्टाइल कॉपी, तपासातून धक्कादायक माहिती उघड, चष्मा...
pmc copy caseImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 01, 2026 | 12:03 PM
Share

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघड झालं आहे. पालिकेच्या परीक्षेत तीन उमेदवारांनी कॉपी केल्याचे उघड झालं आहे. या प्रकरणी तिघांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात टीसीएस कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत चष्मात छुपा कॅमेरा बसवून गैरप्रकार केल्याचं समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्हीमधून गैरप्रकार केल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत गजानन पाचे, शिवशंकर शेळगावे ,विष्णुकांत वाघमारे यांनी कॉपी केली होती. तसेच टीसीएसच्या योगेश राठोड आणि विकास गायकवाडची विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी साथ दिली होती. या प्रकरणी सहा जणांविरोधात या आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांची 90 पेक्षा जास्त गुण मिळाल्याने कनिष्ठ अभियंतापदी निवड झाली होती. पुणे महानगरपालिकेने 169 कनिष्ठ अभियंतापदासाठी एप्रिलमध्ये परीक्षा घेतली होती. मुंबई, नागपूर, अमरावती, कोल्हापूर , नांदेड संभाजीनगरला परीक्षा झाली होती. 22 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी कनिष्ठ अभियंतापदासाठी परीक्षा दिली होती.

परीक्षेला किती जण बसले होते?

मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता प्रवर्गाची परीक्षा ही एप्रिलमध्ये महिन्यात घेण्यात आली होती. या प्रवर्गाच्या 169 जागांसाठी तीन दिवस 7 सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत 42 हजारापैकी 20 हजार 700 उमेदवार बसले होते. या परीक्षेचा निकाल हा 9 जून रोजी जाहीर करण्यात आला. उमेदवारांनी मागणी केल्यानंतर 15 जून रोजी विषयनिहाय निकाल जाहीर करण्यात आला. नियमानुसार, 1:3 या प्रमाणात 545 उमेदवारांची निवड यादी करण्यात आली. त्यानंतर त्यांना 1 आणि 2 जुलै रोजी पडताळणीसाठी बोलविण्यात आले होते.

रोहित पवारांकडून अनेक सवाल उपस्थित 

पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता परीक्षेत गैरप्रकार झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनीही अनेक सवाल उपस्थित केले. ‘पुणे मनपा कनिष्ठ अभियंतापदाच्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं सिद्ध झालं. याप्रकरणी सखोल चौकशीची गरज असल्याचं चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद केलं. तरीही सखोल चौकशी करण्यापूर्वीच महापालिका प्रशासन या परीक्षेतून निवड झालेल्यांना नियुक्त्या देण्याची घाई का करतंय? त्यासाठी कुणाचा दबाव आहे का? प्रामाणिकपणे अभ्यास करुन विद्यार्थी परीक्षा देतात आणि परीक्षेत गैरकृत्य करणाऱ्या रॅकेटच्या माध्यमातून भलत्यांचीच निवड केली जाते, हे अजून किती दिवस खपवून घ्यायचं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा