
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर सध्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शरद पवार यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यानंतर डिहायड्रेशनची समस्या झाल्याने त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानंतर दुसऱ्यांदा शरद पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानंतरही शरद पवार यांची तब्येत खालावली होती, त्यांना बारामतीहून थेट पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. या गोष्टीला काही दिवस होत नाहीत, तोवरच पुन्हा त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. सध्या शरद पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत. शरद पवार यांच्या हेल्थबद्दल अत्यंत मोठी अपडेट आलीये. आज शरद पवार यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या चार दिवसांपासून शरद पवार यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. डिहायड्रेशन झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरद पवारांची प्रकृती व्यवस्थित असल्याने आज डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगितले जाते. शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी व्हाटसअप स्टेट्स ठेवत याबद्दल माहिती दिली होती.
आता शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये मोठी सुधारणा असल्याचे सांगितले जातंय. चेकअपनंतर डॉक्टर आज शरद पवार यांना डिस्चार्ज देतील. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईहून बारामतीकडे निघाले असता अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. ज्यावेळी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, त्यावेळी शरद पवार मुंबईत होते.
जशीही अपघाताची माहिती मिळाली, तसे ते बारामतीला पोहोचले. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले. रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल धक्कादायक आरोप केली जात आहेत. मोठा संशय त्यांनी व्यक्त केला असून VSR विमान कंपनीवर आरोप केले असून काही लोक यांना वाचवत असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले.