AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Health Update: आठ दिवसात दुसऱ्यांदा ॲडमिट, शरद पवार यांना नेमकं काय झालं? किती दिवस रुग्णालयात राहणार? डॉक्टरांनी दिली मोठी माहिती

Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुन्हा प्रकृती बिघडली असल्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये अॅडमिट करण्यात आले आहे.

Sharad Pawar Health Update: आठ दिवसात दुसऱ्यांदा ॲडमिट, शरद पवार यांना नेमकं काय झालं? किती दिवस रुग्णालयात राहणार? डॉक्टरांनी दिली मोठी माहिती
sharad pawarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 22, 2026 | 10:48 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुन्हा प्रकृती बिघडली असल्याचे समोर आले आहे. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुन्हा शरद पवार यांना अॅडमिट करण्यात आले आहे. पण शरद पवार यांना नेमकं काय झालं आहे? त्यांना दुसऱ्यांदा का अॅडमिट करण्यात आले असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत आहेत.

शरद पवारांना नेमंक काय झालं?

शरद पवार हे पुढील दोन दिवस रुबी हॉल क्लिनिक मध्ये अॅडमिट राहणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शरद पवार यांना उलट्या सुरु झाल्या होत्या. उलट्या होत असल्यामुळे शरद पवार यांना डीहायड्रेशन झाले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना सलाइन लावण्यात येणार आहे. त्यांच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. तसेच सिटीस्कॅन देखील करण्यात आले आहे. त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.

डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे. डॉक्टर म्हणाले, “त्यांना खोकला होता. काळजीचं कारण नाही. दोन दिवसात ते घरी जातील. ते बोलत आहेत. डॉ. लोढा तिथे आहे. माझा मुलगा सायमनही तिथे आहे. ते ठिक आहे. पॅनिक होण्याची गरज नाही. त्यांची मुलगी सुप्रिया सुळेही तिथे आहेत. शरद पवारांची प्रकृती स्थिर आहे. डिहायड्रेशनचा त्यांना थोडा त्रास दिला. त्यांना सलाईन लावला. सिटिस्कॅन केला. रिपोर्ट व्यवस्थित आला. आता त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.”

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर लेक सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवले. त्यामध्ये त्यांनी, “आम्ही बाबांना पुन्हा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये अॅडमिट केले आहे. त्यांना हायड्रेशनचा त्रास होत होता. त्यासोबतच त्यांच्या काही टेस्ट बाकी आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही रुग्णालयात दाखल करत आहोत. बाबांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे खूप खूप आभार” असे म्हटले आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा