AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पर्रिकरांसारखं फिरा…, पुण्यातील वाहतूक कोंडीवर वैतागलेल्या महिलेचा सल्ला, अजितदादा म्हणाले कोण पर्रिकर… Video व्हायरल

पुण्यातील मुंढवा-केशवनगर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यादरम्यान एका महिलेने त्यांना थेट प्रश्न विचारून वाहतूक व्यवस्थेतील कमतरतांबद्दल तक्रार केली.

पर्रिकरांसारखं फिरा..., पुण्यातील वाहतूक कोंडीवर वैतागलेल्या महिलेचा सल्ला, अजितदादा म्हणाले कोण पर्रिकर... Video व्हायरल
| Updated on: Sep 14, 2025 | 3:45 PM
Share

पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंढवा-केशवनगर सारख्या परिसरात वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने प्रवाशांना कामावर जाण्यासाठी किंवा घरी परतण्यासाठी बराच वेळ लागतो. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे दौऱ्यावर असताना एका स्थानिक महिलेने वाहतुकीच्या समस्येवरुन थेट प्रश्न विचारला. यावेळी तिने गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे उदाहरण देत अजित पवारांना अचानक पाहणी करण्याचा सल्ला दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील मुंढवा-केशवनगर पुलाच्या पाहणीसाठी गेले होते. या परिसरात अनेकदा वाहतूक कोंडी होताना दिसते. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यावेळी एका महिलेने अजित पवारांना गाठून वाहतुकीच्या समस्येबद्दल आपली तक्रार मांडली. यावेळी ती महिला म्हणाली, “जसे पर्रिकर वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी अचानक फिरायचे, तसेच तुम्ही पण कधीतरी माहिती न देता अचानक या म्हणजे तुम्हाला या ठिकाणी खरी परिस्थिती कळेल. आता तुम्ही प्रश्न विचारणार आणि आम्ही उत्तर देणार, हा या समस्येवर उपाय नाही.” अशा शब्दात त्या महिलेने संताप व्यक्त केला.

त्यावर महिलेने मनोहर पर्रिकर यांचे नाव घेतल्यावर अजित पवारांनी तात्काळ विचारले. “पर्रिकर कोण?” यावर महिलेने, “गोव्याचे मंत्री,” असे म्हटले. यानंतर अजित पवारांनी “मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली, मात्र मला तुम्हाला सांगायचे आहे की मी काम करायला आलो आहे, त्यामुळे मला काम करू द्या,” असे म्हटले. या सर्व संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यादरम्यान केवळ वाहतूकच नव्हे तर इतरही अनेक समस्या समोर आल्या. यावेळी त्यांनी वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मुंढवा चौकात वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष चर्चा केली. या भागात सिग्नल व्यवस्था योग्यरित्या काम करत नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सिग्नल यंत्रणा सुरळीत करण्याचे आणि गर्दीच्या वेळी अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करण्याचे निर्देश दिले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...