AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रशिक्षणात 13 वर्षाच्या एनसीसी कॅडेटला गोळी लागली, प्रशिक्षकाला अखेर शिक्षा सुनावली

पराग इंगळे हा पुण्याच्या पाषाण परिसरातील लॉयोला स्कूलचा विद्यार्थी होता. ज्या दिवशी घटना घडली, त्यादिवशी प्रशिक्षक घाणेकर परागला जमिनीवर झोपून फायरिंग कशी करावी याचे प्रशिक्षण देत होते.

प्रशिक्षणात 13 वर्षाच्या एनसीसी कॅडेटला गोळी लागली, प्रशिक्षकाला अखेर शिक्षा सुनावली
NCCImage Credit source: socialmedia
| Updated on: Apr 14, 2023 | 8:08 PM
Share

पुणे : देशसेवेची संधी मिळण्यासाठी सैन्यात जाण्यासाठी तरूण एनसीसीमध्ये भरती होत असतात. एनसीसीचे प्रशिक्षण खडतर असते. या प्रशिक्षणातून एकप्रकारे देशाचे भावी सैनिकच तयार होत असतात. एखाद्या प्रसंगी लष्कराला जवानांची कमतरता भासली तर दुसरी फळी तयार असावी म्हणून नॅशनल कॅडेट कॉर्पस अर्थात एनसीसीला खूप महत्व आहे, तेरा वर्षांपूर्वी पुण्याच्या एनसीसी मुख्यालयात एक अपघात घडला होता. एनसीसीच्या प्रशिक्षणा दरम्यान एका तेरा वर्षीय विद्यार्थ्याला गोळी लागली होती. या प्रकरणात तब्बल तेरा वर्षांनी न्यायालयाने निकाल दिला आहे.

साल 2013 च्या फेब्रुवारी महिन्यात पुण्याच्या सेनापती बापट मार्गावरील राष्ट्रीय छात्र सेना ( एनसीसी ) मुख्यालयात बंदूकीचे प्रशिक्षण सुरू होते. त्यावेळी प्रशिक्षक आमोद अनिल घाणेकर ( वय 27 , मेहुणपुरा, शनिवार पेठ ) यांच्या बंदूकीतून सुटलेली गोळी पराग देवेंद्र इंगळे ( वय 13 ) याच्या डोक्याला लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पुणे सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांच्या न्यायालयात खटला उभा राहीला होता. त्याचा निकाल अखेर आला आहे.

जमिनीवर झोपून फायरिंग करताना अपघात

पराग इंगळे हा पाषाण परिसरातील लॉयाेला स्कूलचा विद्यार्थी होता. ज्या दिवशी घटना घडली, त्यादिवशी प्रशिक्षक घाणेकर परागला जमिनीवर झोपून फायरिंग कशी करावी याचे प्रशिक्षण देत होते. या दरम्यान, पराग अचानक उभा राहीला. आणि घाणेकर याच्या बंदूकीतून सुटलेली गोळी परागच्या डोक्याला लागली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात डेक्कन पोलीस ठाण्यात आमोद घाणेकर यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात तपास झाल्यानंतर कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात आपला काही दोष नाही, आपल्याकडून चुकीने हे झाले त्यामुळे या प्रकरणातून आपल्याला वगळण्यात यावे अशी याचिका घाणेकर यांनी दाखल केली होती. परंतू सप्टेंबर 2014 रोजी त्यांची याचिका कोर्टाने फेटाळली. विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. राजेश कावेडीया यांनी काम पाहीले.

तीन लाख रूपये परागच्या कुटुंबियाना भरपाई

या प्रकरणात घाणेकर यांना हलगर्जीतून पराग याच्या मृत्यूस जबाबदार ठरवत सात वर्षांची सक्तमजुरी आणि पाच लाख रूपयांचा दंड अशी शिक्षा सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी सुनावली. या पैकी तीन लाख रूपये पराग इंगळे याच्या कुटुंबियाना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. जर दंड न भरल्यास त्यांना आणखी एक वर्षांची शिक्षा भोगावी लागेल असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Follow Us
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त