त्यांचं वय 77, कमाई कोटीत, ही जादु करतात कशी?

| Updated on: Feb 03, 2021 | 1:07 AM

आज आपल्या आजुबाजुला प्रचंड स्पर्धा आहे. त्यातच प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतो. असाच एक प्रकार महाराष्ट्रात पाहायला मिळालाय.

त्यांचं वय 77, कमाई कोटीत, ही जादु करतात कशी?
IndusInd Bank
Follow us on

पुणे : आज आपल्या आजुबाजुला प्रचंड स्पर्धा आहे. त्यातच प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतो. असाच एक प्रकार महाराष्ट्रात पाहायला मिळालाय. 1985 मध्ये एका 42 वर्षांच्या एका व्यक्तीने अशीच एक केमिकल कंपनी सुरु केली. त्याची विक्री देखील मोठ्या प्रमाणात वाढली, पण एका घटनेने त्याचं हे काम करण्याबद्दलचं मत बदललं. त्यांनी जैविक खतांचा उपयोग करण्याचा विचार केला. आज त्यांचं उत्पन्न कोट्यावधी रुपयांचं आहे (A old man from Pune Maharashtra become crorepati through Fertilizer).

महाराष्ट्रातील 77 वर्षीय जयंत बर्वे यांनी फिजिक्समध्ये शिक्षण घेतलं. ते आपल्या केमिकलच्या विक्रीवर खुश होते. मात्र एका घटनेने त्यांचं आयुष्यच बदललं. एकदा एक शेतकरी त्यांच्याकडे आला आणि त्याने असं औषध मागितलं की जे खाऊन पिकांवर बसणारे पक्षी मरतील, कमी होतील. मात्र ही मागणी ऐकून जयंत बर्वे यांचा दृष्टीकोनच बदलला. त्यानंतर त्यांनी जैविक खतांची निर्मिती आणि विक्री सुरु केली.

या जैविक खताला भारतासह जगभरातून मागणी होत आहे. सध्या या व्यवसायातून बर्वे यांनी तब्बल 10 कोटी कमावले आहेत. जयंत बर्वे यांचं खतांच्याबाबतचं मत एका घटनेने एका दिवसात बदललं होतं, पण लोकांचं तसं नव्हतं. त्यामुळे जयंत बर्वे यांना 10 कोटींची कमाई करण्यासाठी तब्बल 30 वर्षे वेळ गेलाय. या काळात त्यांनी आधी आपल्या स्वतःच्या नापिक जमिनीत या खतांचा उपयोग केला.

या जैविक खतांमुळे त्यांच्या स्वतःच्या जमिनीचाही पोत सुधारला. त्यांनी आपल्या शेतात द्राक्षांसोबत दाळिंब, चीकू, आंबा आणि केळ यांचं उत्पादन सुरु केलंय. त्यांनी 1991 मध्ये कीटनाशक व्यवसायही बंद केला आणि शेतीवर भर दिला. आता तब्बल 30 वर्षांनी त्यांना यात पुरेपूर यश मिळालंय. जैविक खतांच्या माध्यमातून ते कोट्याधीश झालेत.

हेही वाचा :

‘बाईकला हेल्मेट दाखवल्याशिवाय सुरूच होणार नाही’, लातूरमधील पट्ठ्याची जुगाडातून कमाल

Bullet Tractor : अवघ्या 8 दिवसात तयार होणारा अनोखा बुलेट ट्रॅक्टर, किंमत फक्त…

‘बाईकला हेल्मेट दाखवल्याशिवाय सुरूच होणार नाही’, लातूरमधील पट्ठ्याची जुगाडातून कमाल

व्हिडीओ पाहा :

A old man from Pune Maharashtra become crorepati through Fertilizer