AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Election | पुणे महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेच्या प्रारूप आराखड्याची प्रतीक्षा ; इच्छुकांच्या मोर्चे बांधणीस प्रारंभ

आगामी जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांचे प्रारूप आराखडे चाचणीसाठी तयार केले असून अद्याप प्रारुप आरखड्याची तारीख जाहीर झाली नसल्याने गट आणि गणांबाबत उमेदवारांच्या मध्ये कमालीची उत्सुकता आहे. आराखड्याबाबतचे अंदाज बांधत अनेकांकडून अधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या निकटवर्तीयाशी संपर्क साधला जात आहे.

Pune Election | पुणे महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेच्या प्रारूप आराखड्याची प्रतीक्षा ; इच्छुकांच्या मोर्चे बांधणीस प्रारंभ
pune-zp
| Updated on: Feb 25, 2022 | 4:06 PM
Share

पुणे – पुणे महानगरपालिकेचा (Pune Municipal Corporation)प्रभाग रचनेचा आराखडा नुकताच प्रसिद्ध झाला. त्या आराखडयातील सूचना – हरकतीवर सुनावणी सुरु आहे. त्यानंतर आता सर्वांना जिल्हा परिषदेची गट( Zilla Parishad), गणांचा प्रारूप आराखड्याची प्रतीक्षा लागली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) या आराखड्याची निर्मिती केली आहे खरं! पण गट संख्या निश्‍चिती झाली तरी आरक्षणाचे काय? कोणते गाव कोणत्या गट अथवा गणाला जोडले याबाबत कमालीची उत्स्कुता इच्छुक उमेदवारांच्या सह स्थानिक राजकारण्यांमध्ये आहे. दुसरेकडं महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यातही निवडणूक आयोगाणे अनेक बदल केले होते. तसेच बदल जिल्हापरिषदेच्या गट व गणात फेरा बदल होण्याच्या चर्चांना ऊत आला आहे.

राजकीय पक्षाच्या मोर्चे बांधणीला सुरुवात

भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या बड्या पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी आपल्या मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. आगामी जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांचे प्रारूप आराखडे चाचणीसाठी तयार केले असून अद्याप प्रारुप आरखड्याची तारीख जाहीर झाली नसल्याने गट आणि गणांबाबत उमेदवारांच्या मध्ये कमालीची उत्सुकता आहे. आराखड्याबाबतचे अंदाज बांधत अनेकांकडून अधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या निकटवर्तीयाशी संपर्क साधला जात आहे.मानाचे पद असलेल्या या पदावर वर्णी लागावी यासाठी गेल्या पाच वर्षांपासून काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी इच्छुकांनी सोशल मीडियावरून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक पातळीवरही सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धीला पेव फ़ुटले आहे.

मोर्चे बांधणीस प्रारंभ

गट-गणाची रचना बदलणार असल्याने आगामी अंदाज बांधणे अवघड बनल्याने इच्छुकांनी आपल्या स्तरावर मोर्चे बांधणीस प्रारंभ . मिळेल त्या मंचाचा त्यासाठी लाभ उचलला जात आहे. गेल्या दहा वर्षांत झालेल्या निवडणुकींमध्ये सोशल मीडियाची मोठी भूमिका असल्याने निवडणूक जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातही याचा वापर केला जात आहे.

Russia Ukraine War : रशिया यूक्रेनमध्ये कीव शहरावरुन संघर्ष, रशियन फौजांना रोखण्यासाठी नद्यांवरील पूल उडवले

Russia Ukraine War : रशिया यूक्रेनमध्ये कीव शहरावरुन संघर्ष, रशियन फौजांना रोखण्यासाठी नद्यांवरील पूल उडवले

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.