AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC Election | पुणे महापालिका प्रारूप प्रभाग रचनेतील हरकती-सूचनांवर सुनावणीचा आजचा दुसरा दिवस ; विकासकामांच्या मंजुरीसाठी सत्ताधाऱ्यांची धरपड

प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती-सूचनांची सुनावणी झाली की आरक्षणे जाहीर होतील . त्यानंतर निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होईल. त्यापूर्वीच शहरातील विविध प्रकल्पाचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव आज स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी येणार आहेत.

PMC Election | पुणे महापालिका प्रारूप प्रभाग रचनेतील हरकती-सूचनांवर सुनावणीचा आजचा दुसरा दिवस ;   विकासकामांच्या मंजुरीसाठी सत्ताधाऱ्यांची धरपड
PMC
| Updated on: Feb 25, 2022 | 11:46 AM
Share

पुणे- आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या (Pune Municipal election)पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील हरकती व सूचनांवर सद्या सुनावणी आहे. प्रभाग रचनेच्या प्राधिकृत आराखड्यावर निवडणूक आयोगाच्या वतीनं सुनावणी सुरु आहे. बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी दहा वाजता यासुनावणीला सुरवात होत आहे. यशदाचे महासंचालक आणि राज्य निवडणूक आयोग (State elections Commission) प्राधिकृत अधिकारी एस. चोक्‍कलिंगम (S. Chokkalingam)यांच्यापुढे या हरकती-सूचना सादर केल्या जात आहेत. काल दिवसभरात आलेल्या 1 हजार 515 हरकती-सूचनांपैकी 353 हरकती गुरुवारी ऐकून घेण्यात आल्या. त्यानंतर 2 हजार 081 हरकतींवर आज सुनावणी होईल. काल दिवसभरात दिवशी नव्या रचनेतील प्रभाग 1 ते 20, 27 ते 31 आणि 33 ते 35 या प्रभागातील तक्रारदारांना बोलावण्यात आले होते. यामध्ये आजी-माजी नगरसेवक, नागरिक, सोसायट्यांचा समावेश होता. गटश: या हरकती नियोजित केल्या आहेत. चोक्‍कलिंगम यांनी हरकती-सूचना ऐकून घेतल्या. दोन दिवस ही सुनावणी चालणार आहे.

प्रशासकीय अधिकारी उपस्थित

प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील सुनावणीसाठी महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार, अतिरिक्‍त आयुक्‍त रवींद्र बिनवडे, अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव दीपक नलावडे, राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव अतुल जाधव, राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस, पुणे महापालिकेतील उपायुक्‍त आणि निवडणूक अधिकारी अजित देशमुख आदी प्रशासकीय अधिकारीही उपलब्ध होते. याबरोबरच ज्या प्रभागातील तक्रारदारांना सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते. त्यातील जे अनुपस्थित राहिले त्यांची पुन्हा सुनावणी होणार नाही. असे ही सांगण्यात आले आहे.

विकासकामांच्या मंजुरीचा धडाका

प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती-सूचनांची सुनावणी झाली की आरक्षणे जाहीर होतील . त्यानंतर निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होईल. त्यापूर्वीच शहरातील विविध प्रकल्पाचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव आज स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी येणार आहेत. आचारसंहिताही लागू होण्यापूर्वी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी त्यांनी जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करून घेण्याला सुरूवात केली आहे. आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत दीड हजार कोटी रुपयांचा जायकाचा प्रस्ताव आणि 300 कोटी रुपयांचा नदी सुशोभिकरणाचा प्रस्ताव यासह अन्य अनेक प्रस्ताव मंजुरीसाठी आणले जाणार आहेत.

तुम्हाला हार्ट अ‍टॅक येणार की नाही, हे आता तीन वर्ष आधीच समजू शकतं, कसं ते समजून घ्या?

गुगल क्रोमचे लाइट मोड फीचर लवकरच बंद होणार, काय आहे नेमके कारण जाणून घ्या!

रशियाची ‘ही’ सुप्रसिद्ध मॉडेल, जी आपल्या निळ्या डोळ्यांनी करते अनेकांना घायाळ

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.