वकील सदावर्ते यांच्यावर अजित पवार यांचा पहिल्यांदा निशाणा; म्हणाले, आता ‘डंका’ कुठे गेला?

| Updated on: Jan 13, 2023 | 7:34 PM

आता डंका कुठे गेला नि चोट कुठे गेली. आता एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही. जबाबदार कोण, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.

वकील सदावर्ते यांच्यावर अजित पवार यांचा पहिल्यांदा निशाणा; म्हणाले, आता डंका कुठे गेला?
अजित पवार
Follow us on

पुणे : एसटी संपावरून पहिल्यांदा अजित पवार (Ajit Pawar) यांनी वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Sadavarte) यांच्यावर टीका केली. एसटीच्या वेळी आमचं सरकार असताना ही शहाणी काही आमदार तिथं जाऊन झोपत होती. घोषणा देत होते. एक तर म्हणायचा डंके की, चोट पे करुंगा. डंके की चोट पे करुंगा. आता डंका कुठे गेला नि चोट कुठे गेली. आता एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही. जबाबदार कोण, असा सवाल अजित पवार यांनी विचारला. सरकार आमचं असलं की रात्रंदिवस तुम्ही तिथं आंदोलन करणार.

एसटी बंद होती, तर पगाराला अडीच कोटी रुपये देत होतो. उपकार केले नाही. कारण त्यांची पण कच्ची-बच्ची घरात आहेत. कशी ही माणसं बदलतात बघा. सरडा कसा बदलतो. यांचं सरकार आलं. आता बोलायला तयार नाही. मूग गिळून गप्प बसलेत, अशी टीका अजित पवार यांनी केली.

कायदा बिघडविण्याचा प्रयत्न करू नये

राज्यात कुणालाही कुठंही फिरायचा अधिकार आहे. कायदाचा आदर केला गेला पाहिजे. संविधानाचा आदर झाला पाहिजे. हातात कायदा घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये. मग ते अजित पवार असोत की, समोरचा दुसरा कोणीही असो. या पद्धतीनं सरकार चालत असतं. कायदा बिघडविण्याचा प्रयत्न करू नये, अशी तंबी अजित पवार यांनी दिली.

कोणी कितीही मोठ्या बापाचा असो…

कोणीतरी पुण्यात कोयता घ्या म्हणत होते. कसला कोयता घ्या. सभागृहामध्ये सटकवलं सरकारनं काय करता रे तुम्ही. काम नाही होत. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायचं पोलिसांचं काम आहे. कोणीही उठते कसलीही गँग करते. कितीही मोठ्या बापाचा असेल, कायदा बिघडविण्याचा प्रयत्न केला तर कारवाई झालीचं पाहिजे. मग, सत्ताधारी पक्षाचा असो की, विरोधी पक्षाचा.तर महाराष्ट्र व्यवस्थित चालू शकेल.

अष्टविनायकांपैकी पाच ठिकाणी निधी देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून आराखडा तयार करून घेतला. भाविकांना चांगल्या प्रकारे दर्शन घेता आले पाहिजे. भाविकांना त्यातून समाधान मिळालं पाहिजे. ही त्याच्यामागची भावना आहे, असंही अजित पवार म्हणाले.