Video:सोनसाखळीसाठी दुकानात आला अन् चाकूने सरळ दुकान मालकावरच हल्ला चढवला; घटना सीसीटीव्हीत कैद

दुकानातील ज्या सराफी व्यावसायिकावर चाकूने हल्ला झाला आहे. त्या हल्लेखोराचा तपास भारती विद्यापीठ पोलिसांकडून सुरु असून पोलीस पथके रवाना झाली आहेत. 

Video:सोनसाखळीसाठी दुकानात आला अन् चाकूने सरळ दुकान मालकावरच हल्ला चढवला; घटना सीसीटीव्हीत कैद
पुण्यात दिवसढवळ्या सराफावर चाकू हल्ला
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 9:36 PM

पुणेः पुण्यातील आंबेगाव खुर्द (Pune Ambegaon) येथील वैभव लक्ष्मी ज्वेलर्समध्ये धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. यावेळी सोनसाखळी खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात एकाने प्रवेश केला. त्यानंंतर पिशवीतील सुर्‍याने सराफ व्यवसायिकावर हल्ला करून जबरी चोरीचा (Robbery in a gold shop) प्रयत्न केला, मात्र त्याने हल्ला केल्यानंतरही प्रतिकार करण्यात आल्यामुळे हल्लेखोर पळून गेला होता. मात्र पोलिसांनी सापळा रचून त्याला काही तासातच भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati university Police) ताब्यात घेतले आहे. गौरव विजय रायकर (वय. 25,रा. धायरी) असे त्याचे नाव आहे. गुरूवारी दुपारी पावणे पाच वाजता आंबेगाव खुर्द येथील वैभवलक्ष्मी ज्वेलर्समध्ये मालक असताना ही घटना घडली होती.

या चोरट्याच्या हल्ल्यात विनोदकुमार सोनी (वय.42,रा. आंबेगाव खुर्द) हे जखमी झाले असून त्याप्रकरणी सोनी यांनी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सोने खरेदी करायची आहे…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांचे आंबेगाव खुर्द येथील पृथ्वीराज हाईटस् या इमारतीत वैभवलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी एक वाजता गौरव विजय रायकर हा त्यांच्या दुकानात आला होता. आई-वडील पाठीमागून येत आहेत, मला सोनसाखळी खरेदी करायची आहे असे सांगत तो खूप वेळ दुकानात बसून होता. त्यानंतर खूप वेळ झाल्यामुळे सोनी यांनी दुकान बंद केले. तेव्हा रायकर हा दुकानातून निघून गेला होता. त्यानंतर परत तो पावणे पाच वाजता सोनी यांच्या दुकानात तो हल्लेखोर सोने खरेदी करण्यासाठी आला.ॉ

दुपारनंतर दुसऱ्यांदा दुकानात

पुन्हा ज्वेलर्समध्ये आल्यावरही त्याने पूर्वीचेच कारण सांगितले आणि दुकानात बसला. सोनी यांना वाटले की, खरोखर त्याच्या घरचे कोणीतरी येत आहे म्हणून तो त्याला बसण्यास सांगितले. यावेळी रायकर याने तुम्ही सोने कसे देता, पैसे रोख की ऑनलाईन घेणार अशी विचारपूस केली.ही विचारपूस करत असताना त्याने अचानक पिशवीतून सुरा काढून त्यांच्यावर हल्ला करत दागिणे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत सोनी यांनी रायकर याचा प्रतिकार करुन त्याला विरोध केला आणि त्याचा हल्ला परतवून लावला. यावेळी दोघामध्ये झटापट झाली.

प्रतिकार केल्याने पळ काढला

सोनी यांनी त्याला जोरदार प्रतिकार केला गेल्यामुळेच  रायकर याने पळ काढला. झटापटीत सोनी यांच्या कपाळावर सुर्‍याची जखम झाली आहे. हा प्रकार सुरू असताना बाहेर काही नागरिक देखील होते. मात्र त्यांनी थोडे देखील धाडस दाखविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे रायकर दुचाकीवर बसून फरार झाला होता.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला पकडण्याच्या सूचना तपास पथकाला केल्या होत्या. त्यानुसार पथकाने रायकर याला ताब्यात घेतले.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.