मोठी बातमी ! या निवडणुकीत अजितदादा गटाकडून चक्क पैसे वाटप? बारामतीतच घडला प्रकार; नगराध्यक्षाच्या गाडीत…

बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार गटावर पैसे वाटपाचा गंभीर आरोप झाला आहे. नगराध्यक्षांच्या गाडीत २० लाख रुपये आढळल्याच्या दाव्याने राजकीय खळबळ उडाली आहे. विरोधकांनी हा आरोप करत अजितदादा गटाला ही निवडणूक जड जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. उद्या मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मोठी बातमी ! या निवडणुकीत अजितदादा गटाकडून चक्क पैसे वाटप? बारामतीतच घडला प्रकार; नगराध्यक्षाच्या गाडीत...
Someshwar Sugar Factory Election
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 8:42 AM

सध्या राज्यात बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चांगलीच गाजत आहे. या निवडणुकीत कुणाचं वर्चस्व राहणार याची राज्यात चर्चा सुरू आहे. कारखान्यावर आपलं वर्चस्व राहावं म्हणून सर्वांकडूनच ताकद लावली जात आहे. मात्र, दिवंगत नेते अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतील या निवडणुकीत अजितदादा गटावर चक्क पैसे वाटप करण्याची वेळ आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विरोधकांनी तसा आरोप करून राजकीय धुरळाच उडवून दिला आहे. त्यामुळे अजितदादा गटाला ही निवडणूक जड जातेय का? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून पैसे वाटप केल्याचा आरोप केला जातोय. माळेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष यांच्या गाडीत 20 लाख रुपये सापडल्याचा आरोप पुरुषोत्तम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री सभासदांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप आहे. या संदर्भात आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत पुरुषोत्तम जगताप काय धक्कादाक खुलासे करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...

उद्या मतदान

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून उद्या 21 जागांसाठी मतदान पार पाडणार आहे. त्याआधी पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका छोट्या निवडणुकीत अजितदादा गटावर पैसे वाटप करण्याची वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दोन तास वाट पाहिली…

दरम्यान, काल सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी काल मतदारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. आपल्याला या ठिकाणी जे काही वैभव दिसत आहे, ते दादांची दूरदृष्टी, त्यांचं नेतृत्व, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांची मिळालेली साथ या सगळ्यांमधून आपल्याला सगळ्या गोष्टी उभ्या करता आल्या आहेत.

सोनेश्वर कारखान्याने 3800 रुपये दर जाहीर केला. राज्यातील हा एक नंबरचा दर आहे. इथं संजय जगताप बसलेले आहेत. पुरंदरचे माजी आमदारांच्या पाठीमागे किती मोठी ताकद आहे हे आपल्याला माहिती आहे. 34 वर्ष या कारखान्यामध्ये मी संचालक म्हणून काम करत आहे. 13 वर्षे तुमच्या पुण्याईने चेअरमन म्हणून काम केलं आहे. सोमेश्वर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली त्यावेळी मी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना म्हटलं होतं की, आपण एकत्र बसू. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी गेलो होतो. गेट लावलेलं होतं. निरोप दिला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन पुरुषोत्तम जगताप दोन तास देवगिरीच्या गेटवर थांबला होता. निरोप देऊन सुद्धा भेट झाली नाही. परत आलो, असं जगताप म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us