AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंनी जे केलं तेच शिंदे… बडा नेता नाराज होताच एकनाथ शिंदे संतापले; थेट म्हणाले, विचार करावा लागेल…

गजानन कीर्तिकर यांच्या नाराजीमुळे शिवसेना (शिंदे गट) मध्ये खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंप्रमाणेच वागल्याचा आरोप कीर्तिकर यांनी केला. यावर शिंदे संतापले आणि त्यांनी कीर्तिकरांवर जाहीर नाराजी व्यक्त केली. मात्र, शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर कीर्तिकर यांनी सारवासारव करत नाराजी नसल्याचे आणि पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंनी जे केलं तेच शिंदे... बडा नेता नाराज होताच एकनाथ शिंदे संतापले; थेट म्हणाले, विचार करावा लागेल...
eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 8:00 AM
Share

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर सध्या प्रचंड नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी काल जाहीर बोलून दाखवली. मी पक्षात नाराज आहे. मला एकनाथ शिंदे भेटत नाहीत. उद्धव ठाकरेंनी जे केलं तसंच ते करत आहेत. मी नाराज असलो तरी दलबदलू नाही. मी पक्ष सोडणार नाही. पण माझ्या नेत्यापर्यंत माझी नाराजी गेली पाहिजे, असं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं होतं. कीर्तिकर यांची ही नाराजी जाहीर होताच. एकनाथ शिंदे संतापले आहेत. शिंदे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे शिवसेनेत सारं काही अलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पक्षात नाराज असल्याच्या बातम्या आणि पुन्हा ठाकरे गटात परत जाण्याच्या बातम्या आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कीर्तीकारांवर संतापले आहेत. असं असेल तर आम्हाला विचार करावा लागेल. जानन कीर्तिकरांचा संध्याकाळी एक कार्यक्रम आहे. कार्यक्रमाला देखील यायचं की नाही हे आम्हाला ठरवावे लागेल. घडलेल्या घटनेवर खुलासा करा, असा संताप एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

पत्रकारांशी मैत्री नको

यावेळी एकनाथ शिंदे यांनी कीर्तिकर यांनी सल्लाही दिला आहे. पत्रकारांशी जास्त मैत्री करू नका. इथे डॅमेज कंट्रोल करायला मी बसलो आहे. शिवसेना हे एक कुटुंब आहे. मुख्यमंत्री असताना मी चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन म्हणून राहिलो, असं शिंदेंनी म्हटलं. त्यानंतर शिंदे यांनी कीर्तिकर यांच्याशी संपर्क करून त्यांच्याशी संवाद साधला. यानंतर कीर्तिकर यांची नाराजी दूर झाल्याचं सांगितलं जात आहे.

शिंदेंनी संपर्क केल्यानंतर कीर्तिकर यांनी मीडियाशी संवाद साधला. लोकांच्या कामासाठी एकनाथ शिंदेंशी संपर्क होतं नव्हता. एकनाथ शिंदेंनी ओएसडींना सांगून संपर्काची व्यवस्था करतो असं सांगितलं, असं सांगतानाच मी शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही, असंही कीर्तिकर म्हणाले.

मी नाराज नाही, पक्ष सोडणार नाही

त्यानंतर कीर्तिकर यांनी सारवासारवही केली. दुपारपासून वृत्तवाहिन्यांवर बातमी पाहिली. मला आश्चर्याचा धक्का बसला. मी पक्ष सोडणार, नाराज आहे असे वृत्त होते. मी महाराष्ट्राला माझे मत सांगायला आलो आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाधानाने काम करत आहे. गोव्यात मी प्रभारी म्हणून काम करत आहे. मी स्पष्ट सांगतो की ते वृत्त निराधार आहे. माझी पक्ष सोडण्याची कोणतीही इच्छा नाही, अशी सारवासारव कीर्तिकर यांनी केली.

शिंदेंनी फोन केला…

काँग्रेस सोबत असलेले लागेबांधेमुळे मी जुना पक्ष सोडला. एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला त्याला मी साथ दिली. समाधानाने मी इथे काम करत आहे. कुठल्याही पक्षात जाण्याची माझी इच्छा नाही. एकनाथ शिंदे यांनी फोन केला. माझ्याबाबतीत चौकशी केली. मी नाराज नाही. पक्ष सोडणार नाही, असं मी त्यांना सांगितलं, अशी माहितीही त्यांनी दिली.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...