AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil: मोठी बातमी! अपघाता वेळी गौतमीच्या गाडीत होता मोठा अधिकारी? काय करत होता? खळबळजनक दावा काय?

Gautami Patil: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघाताची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या अपघतात जखमी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी आता मोठी माहिती दिली आहे. अपघातावेळी गाडीमध्ये मोठा अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Gautami Patil: मोठी बातमी! अपघाता वेळी गौतमीच्या गाडीत होता मोठा अधिकारी? काय करत होता? खळबळजनक दावा काय?
Gautami Patil car accidentImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 04, 2025 | 1:51 PM
Share

महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सध्या चांगलीच चर्चेत आहे. पण यावेळी ती तिच्या नृत्यामुळे किंवा कार्यक्रमामुळे चर्चेत नसून तिच्या गाडीच्या अपघातामुळे चर्चेत आहे. गौतमीच्या गाडीचा पुण्यात अपघात झाला. गौतमीचे वाहन आणि रिक्षाचा अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी आहे. सध्या रिक्षा चालकावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी गौतमीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

30 सप्टेंबर रोजी पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक भागात एका कारने रिक्षाला धडक दिली. या धडकेत रिक्षा ड्रायव्हर जबर जखमी झाला. पण कार चालक मात्र तेथून पळून गेला. आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे. जखमीच्या कुटुंबातील एका व्यक्तीने अपघातावेळी गाडीमध्ये मोठा अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

वाचा: 19 महिलांशी संबंध, दुसऱ्या बायकोचा नको तो व्हिडीओ… घरात गुप्त कॅमेरा… अन्… या घटनेने अख्खं राज्य हादरलं; काय काय घडलं?

काय म्हणाले कुटुंबीय

जखमी रिक्षा चालकाच्या मुलीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने, ‘पोलीस मॅनेज झाले आहेत. पोलीस गौतमी पाटीलला वाचवण्याचा प्रयत्न करतायेत’ असे म्हटले आहे. ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस गाडीत कोणीतरी मोठा अधिकारी असल्याचा संशय जखमी व्यक्ती समाजी मरगळे यांची मुलगी अर्पणा मरगळे यांनी केला आहे.

सगळं मॅनेज केल्याचा आरोप

त्याचबरोबर तपास अधिकारी मालुसरे यांचे सीडीआर तपासण्यात यावे त्यांची देखील चौकशी व्हावी त्यांनी हे सगळं मॅनेज केले असा आरोप जखमी व्यक्तीच्या मुलीने केला आहे.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गौतमी पाटीलच्या वाहनाची पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला. हा अपघात एका हॉटेल समोर झाला. हॉटेलच्या समोर एक रिक्षा उभी होती. या रिक्षेला गौतमी पाटीलच्या वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर रिक्षा तीन वेळा पटली झाली. गाडीतील लोक उतरले आजूबाजुला फार कोणी नसल्याचा अंदाज घेत तेथून निघून गेले. जखमी रिक्षाचालक बराच वेळ रस्त्यावर तसाच पडून होता.

पोलिसांच्या हाती CCTV फुटेज

पोलिसांनी नृत्यांगना गौतमी पाटील हिलालही जबाब देण्यासाठी नोटीस पाठवली असून हजर राहण्यास बजावण्यात आलं आहे. एवढंच नव्हे तर ज्या रात्री अपघात घडला त्या वेळचं CCTV फुटेज देखील पोलिसांच्या हाथी लागलं असून त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. त्या फुटेजमध्ये काय सापडतं हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. त्यामध्ये कोणी अधिकारी खरच गाडीमध्ये होता का? हे स्पष्ट होईल.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.