AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : झोपायला विरोध केला म्हणून डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक! भिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पुण्यात तरुणास ठोकल्या बेड्या

अनोळखी भिक्षेकऱ्याने तरुणाला झोपण्यास विरोध केला. तसेच त्यास शिवीगाळही केली. या प्रकारामुळे चिडलेल्या अंगीरने तेथेच पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून भिक्षेकऱ्याच्या डोक्‍यात घातला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने भिक्षेकऱ्याचा मृत्यू झाला.

Pune crime : झोपायला विरोध केला म्हणून डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक! भिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पुण्यात तरुणास ठोकल्या बेड्या
कोल्हापूरमध्ये गोदामातील साखरेच्या पोत्यांची थप्पी अंगावर पडून मजुराचा मृत्यूImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: May 04, 2022 | 10:50 AM
Share

पुणे : झोपण्याच्या वादातून अनोळखी भिक्षेकऱ्याच्या खून (Murder) झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Samarth Police station) एका तरुणाला अटक केली आहे. पदपथावर झोपण्यातून हा वाद झाला होता. यावेळी तरुणाने एका अनोळखी भिक्षेकऱ्याच्या डोक्‍यात सिमेंटचा ब्लॉक घातला. त्यातच त्या भिक्षेकऱ्याचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास नाना पेठेत ही घटना घडली आहे. आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मोहित अमीर अंगीर (वय 30, रा. खडकी) असे अटक (Arrest) केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी रिझवान शेख (वय 41, रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेतील पदमजी चौकातील पदपथावर मागील काही महिन्यांपासून भिक्षेकऱ्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्यावेळी भिक्षेकरी पदपथावर झोपतात.

मारहाण आणि शिवीगाळ

सोमवारी रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास मोहित अंगीर हा तरुण पदमजी चौकातील पदपथावर झोपण्यासाठी आला होता. मात्र तेथे अगोदरच झोपलेल्या एका अनोळखी भिक्षेकऱ्याने त्याला झोपण्यास विरोध केला. तसेच त्यास शिवीगाळही केली. या प्रकारामुळे चिडलेल्या अंगीरने तेथेच पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून भिक्षेकऱ्याच्या डोक्‍यात घातला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने भिक्षेकऱ्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडाच पडलेला पाहायला मिळाला.

परिसरात वाढला भिक्षेकऱ्यांचा वावर

याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीलाही तत्काळ अटक केली. आता या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून परिसरात भिक्षेकऱ्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. त्यांच्यात अनेकवेळा वादही होतात. हे वाद टोकाला जातात. सोमवारीही झोपण्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणाचा भिक्षेकऱ्यासोबत वाद झाला. त्याचा परिणाम खुनात झाला आहे. पोलिसांनी गस्त वाढवून असे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात