Dattatreya bharne | ‘दादा’ हा ‘दादाच आहे, दादाच्या नादी लागल्यावर काही होऊ शकत’.. का म्हणाले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे असे?

येत्या काही दिवसात अनेक विरोधक राष्ट्रवादीमध्ये येणार असल्याचा गौप्स्फोट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला, यावेळी बोलताना भरणे म्हणाले प्रशांत बापूंसारखी माणस स्टेजवर दिसतील.. प्रशांत बापू पाटील हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू आहेत, मागील काही महिन्यांपूर्वी प्रशांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Dattatreya bharne | 'दादा' हा 'दादाच आहे, दादाच्या नादी लागल्यावर काही होऊ शकत'.. का म्हणाले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे असे?
राज्यमंत्री भरणे यांनी पाटील यांच्यावर केली सडकून टिका.Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 8:02 PM

इंदापूर – आमचा दादा हा दादाच आहे, दादाच्या नादी लागल्यावर काही होऊ शकते. हे आपण इंदापूर व पुरंदर ला पाहिले आहे असे म्हणत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)यांचं कौतुक करून हर्षवर्धन पाटील यांना चिमटा काढल्याचे दिसून आले. इंदापूर तालुक्यातील निरवांगी गावात भूमिपूजन व उद्घाटन समारंभात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Minister of State Dattatreya bharne) बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील(Harshvardhan Patil) व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीचे फोटो वायरल होऊन इंदापूर तालुक्‍यात याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर शहरातील नूतन नगरपालिकेच्या इमारतीसाठी अधिकचा निधी आणण्यासाठी आपण स्वतः व नगराध्यक्ष यांना घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाऊन या संदर्भात निधी आणू असे भाषणात सांगितले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी अनेक नेते इच्छुक

“विकास कामे घेऊन जायला मी आहे की मी कुठे गेलोय व्हय, दादाकडे विकास कामे घेऊन जायला मी आहेच की, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांना चिमटा काढला व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी तालुक्यात अनेक बडे नेते इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट ही यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या खास शैलीत केला, भरणे म्हणाले,” या महिन्यात अनेक करामती तुम्हाला दिसतील.‌ तुम्ही विचारही केला नसेल अशी माणसं प्रशांत बापूंसारखी स्टेजवर दिसतील. आपल आन दादाचं लय चांगलंय असं सांगण्याचा प्रयत्न होतोय, (माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता)मग चांगलं होतं तर कुठे गेलं. एक नाटक करायचं व जनतेची दिशाभूल करायची. असं बाबांनो नसतं. आमचा दादा हा दादाच आहे.. दादाच्या नादी लागला की लागल्यावर काही होऊ शकते हे आपण इंदापूर व पुरंदर ला पाहिले आहे. अशे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हटल्यावर सभेत एकच हशा पिकला.

हर्षवर्धन पाटील यांचे घरातील अगदी जवळचे नातेवाईक भरणेंच्या संपर्कात?

येत्या काही दिवसात अनेक विरोधक राष्ट्रवादीमध्ये येणार असल्याचा गौप्स्फोट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला, यावेळी बोलताना भरणे म्हणाले प्रशांत बापूंसारखी माणस स्टेजवर दिसतील.. प्रशांत बापू पाटील हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू आहेत, मागील काही महिन्यांपूर्वी प्रशांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. याच प्रशांत बापूंचा भाषणात भरणे यांनी उल्लेख केला की, प्रशांत बापून सारखी माणसं आपल्या स्टेजवर दिसतील, म्हणजेच याचा अर्थ असा होतो की, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे घरातील अगदी जवळचे नातेवाईक भरणेंच्या संपर्कात आहेत की काय? अशी चर्चा आता खासगीत इंदापूर तालुक्यात रंगत आहे, येत्या काही दिवसात ज्यावेळी हे प्रवेश होतील त्याच वेळी खऱ्या अर्थाने नेमके कोण कोण भरणे यांच्या संपर्कात होते हे जनतेला कळेल.

भावा, कशाला वेडेपणा करतोयस? तरसाचं चुंबन घेणाऱ्याला यूझर्स करतायत सावधान! Hyena video viral

शिवसेना नेते सुधीर जोशी यांच्या अंत्यसंस्काराला राज ठाकरे यांची उपस्थिती

टीम इंडियासाठी Good News, एक मोठा खेळाडू पुनरागमनासाठी फिट तर दुसरा जाणार बाहेर

Non Stop LIVE Update
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका.
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका.
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.