AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भावा, कशाला वेडेपणा करतोयस? तरसाचं चुंबन घेणाऱ्याला यूझर्स करतायत सावधान! Hyena video viral

Wild animals video : तरस (Hyena)... जंगलातील एक भयंकर (Dangerous) आणि क्रूर प्राणी. एक व्यक्ती भयंकर अशा तरसाचे चुंबन (Kiss) घेताना दिसत आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ असून सोशल मीडियावर या व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे.

भावा, कशाला वेडेपणा करतोयस? तरसाचं चुंबन घेणाऱ्याला यूझर्स करतायत सावधान! Hyena video viral
तरसाचं चुंबन घेणारी व्यक्ती
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 18, 2022 | 5:35 PM
Share

Wild animals video : तरस (Hyena)… जंगलातील एक भयंकर (Dangerous) आणि क्रूर प्राणी… शिकार पाहून तो ज्या पद्धतीने त्याच्यावर तुटून पडतो आणि अत्यंत क्रूरपणे खातो, त्यावरून त्याचा धोकादायकपणा आपल्याला दिसून येतो. कधीकधी तर ते सिंहासारख्या प्राण्यावरही हल्ला करतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत जो याचा पुरावा आहे. पण आजकाल तरस आणि माणसाचा असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सर्वांनाच या व्हिडिओने आश्चर्याचा धक्का दिला आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती भयंकर अशा तरसाचे चुंबन (Kiss) घेताना दिसत आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ असून सोशल मीडियावर या व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्‍ये भयंकर हायनाला मिठी मारणारा एक माणूस खेळण्यासारखे चुंबन घेत आहे.

वाढू शकतात हृदयाचे ठोके

सोशल मीडियावर वन्यजीवांशी संबंधित काही व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. यापैकी काही इतके मनोरंजक आहेत की तुम्हाला ते पुन्हा पुन्हा पाहायला आवडतात. त्याचबरोबर काही व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाते. या व्हिडिओत आपण पाहू शकता, की तरसाचे एक व्यक्ती चुंबन घेत आहे. मात्र तरस त्याच्यावर हल्ला करत नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कमकुवत हृदयाच्या लोकांच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात.

इन्स्टाग्रामवर शेअर

हायना आणि एका माणसाचा हा अत्यंत धक्कादायक व्हिडिओ wildlifeinsyder या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. 5 फेब्रुवारीला हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत 1 लाख 20 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूझर्स सतत त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. तरसाने त्या व्यक्तीवर हल्ला कसा केला नाही, याचे लोकांना आश्चर्य वाटते.

आणखी वाचा :

Viral : चुकून काच फुटली असती तर? बाळाचा हा अंगावर काटा आणणारा Panther Video पाहा

…अन् असा ‘धप्पा’ दिला, की आईही घाबरली; वाघाचा ‘हा’ Cute video झालाय Viral

Cat dog video : कुत्रा तुपाशी, मांजर उपाशी! ‘असा’ लगावला ‘मौके पे चौका’ की नेटिझन्स म्हणतायत, हा तर Smartdog!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...