…अन् असा ‘धप्पा’ दिला, की आईही घाबरली; वाघाचा ‘हा’ Cute video झालाय Viral

प्रदीप गरड

|

Updated on: Feb 18, 2022 | 2:18 PM

Animal cute video : खोडकरपणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये वाघाचा (Tiger) छोटासा बछडा (Calf) आपल्या आईसोबत लपाछपीचा (Hide And Seek) खेळ खेळताना दिसत आहे. छोटा वाघ मागून येतो आणि वाघिणीला गोंडस पद्धतीने धप्पा मारतो.

...अन् असा 'धप्पा' दिला, की आईही घाबरली; वाघाचा 'हा' Cute video झालाय Viral
वाघिणीला थप्पा देताना बछडा

Animal cute video : मुलांच्या खोडकरपणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या खोड्या इतक्या गोंडस (Cute) असतात, की त्या पाहून तुम्ही त्या निरागसतेच्या प्रेमात पडाल. हे केवळ आपल्या माणसांमध्येच नाही, तर प्राण्यांनाही लागू होते. आता असाच खोडकरपणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये वाघाचा (Tiger) छोटासा बछडा (Calf) आपल्या आईसोबत लपाछपीचा (Hide And Seek) खेळ खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, एक छोटा वाघ मागून येतो आणि वाघिणीला अतिशय गोंडस पद्धतीने धप्पा मारतो. हा गोड व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल आणि छोट्याशा वाघाच्या प्रेमातही पडाल. अत्यंत गोड असा हा व्हिडिओ आहे. तो तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल. अनेकजण हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

बछड्याची आईसोबत मजामस्ती

व्हिडिओमध्ये पांढऱ्या वाघाचा बछडा त्याच्या आईसोबत मजामस्ती करताना दिसत आहे. चिमुकल्या वाघाचा हा खोडकरपणा पाहून तो वाघिणीशी लपाछपी खेळत असल्याचा भास होत आहे. आईचे दुसरीकडे लक्ष आहे हे पाहताच मग तो मागून तिच्यासमोर उडी मारतो आणि धप्पा मारतो. समोर उभी असलेली वाघीण त्याला घाबरते. मागून आपले लेकरू आले आहे हे ती नंतर पाहते. या वाघिणीच्या गोंडस बछड्याची स्टाइल लोकांच्या पसंतीस उतरली आहे.

‘…तर मला चप्पल मिळाली असती’

हा व्हिडिओ IAS प्रियंका शुक्ला यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. ज्याला 49 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच यूझर्सकडून या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका यूझरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, की मी अशा प्रकारे धप्पा दिला असता तर मला नक्कीच चप्पल मिळाली असती’. दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘हे पाहून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.’ याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या.

आणखी वाचा :

Viral : चुकून काच फुटली असती तर? बाळाचा हा अंगावर काटा आणणारा Panther Video पाहा

Bhuban Badyakar पोहोचला पॅरिसमध्ये..! ‘Kacha Badam’ गाण्यावर कसा केला तरुणाईनं Dance? पाहा, Viral Video

कोल्हाही घेतोय बँजोच्या सुरांचा आनंद, 1 कोटींहून जास्तवेळा पाहिला गेलाय ‘हा’ Viral Video

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI