Animals cute & funny video : सोशल मीडियावर तुम्ही प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. माणसाचे सर्वात आवडते प्राणी म्हणजे कुत्रा आणि मांजर. कुत्रा हा अतिशय हुशार आणि निष्ठावान प्राणी असल्यामुळे बहुतेक कुत्रे आपल्या घरात पाळले जातात. यानंतर लोक दुसऱ्या क्रमांकावर मांजरी ठेवतात. लोकांना मांजरी खूप आवडतात. साधारणपणे असे दिसून आले आहे, की मुलींना मांजर जास्त आवडते. सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या मुलीला कुत्रा आणि मांजर दोन्ही आवडतात. मुलीने तिच्या घरात एक गोंडस मांजर (Cute cat) आणि हुशार कुत्रा (Smart dog) पाळला आहे. हा व्हिडिओ कुत्रा आणि मांजर दोघांशी संबंधित आहे, जो खूप मजेदार (Funny) आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ आल्यानंतर लोक गंमतीने पाहत आहेत, तसेच कुत्र्याच्या हुशारीचे कौतुक करत आहेत.
व्हिडिओ पाहिल्यानंतर, तुम्हाला हे देखील समजेल, की आम्ही येथे कुत्र्याच्या धूर्ततेबद्दल का बोलत आहोत. व्हिडिओमध्ये ती मुलगी मांजरीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. आपण पाहू शकता, की ती मांजरीचे चुंबन घेण्यासाठी तिचे तोंड मांजरीकडे नेते. ती मांजरही तिचे चुंबन घेण्याची वाट पाहत आहे. मग अचानक कुत्रा मध्ये येतो आणि मुलीचे चुंबन घेतो. कुत्र्याचा स्मार्टनेस पाहून मुलगीही हैराण झाली आहे.
व्हिडिओ पाहून सर्वजण कुत्र्याला हुशार असल्याचे सांगत आहेत. कुत्र्याच्या या स्मार्टनेसने नेटिझन्स थक्क झाले आहेत. कुत्र्याने मौके पे चौका लगावल्याचे लोक सांगत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना हसू येत आहे. सोशल मीडिया यूझर्स व्हिडिओला प्रचंड लाइक आणि शेअर करत आहेत. याशिवाय कमेंट बॉक्समध्येही यूझर्स कुत्र्याच्या स्मार्टनेसचे कौतुक करत थकत नाहीत. एका यूझरने लिहिले, की प्रत्येकजण प्रेम आणि लक्ष वेधण्यासाठी व्याकूळ आहे.’
View this post on Instagram