AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हाही घेतोय बँजोच्या सुरांचा आनंद, 1 कोटींहून जास्तवेळा पाहिला गेलाय ‘हा’ Viral Video

Power of music : अमेरिकेतील एका बॅन्जो वादकाचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये एक कोल्हा (Fox) बँजोच्या (Banjo) सुरांचा आनंद घेताना दिसत आहे. अँडी थॉर्न कोलोरॅडोच्या टेकड्यांवर सूर्यास्ताच्या वेळी बँजो वाजवत होता, ते ऐकून कोल्हा मंत्रमुग्ध झाला.

कोल्हाही घेतोय बँजोच्या सुरांचा आनंद, 1 कोटींहून जास्तवेळा पाहिला गेलाय 'हा' Viral Video
बँजोच्या सुरांचा आनंद घेताना कोल्हा
| Updated on: Feb 17, 2022 | 2:41 PM
Share

Power of music : भगवान श्रीकृष्णाच्या बासरीच्या सुराने सर्वांनाच वेड लावले होते. असे म्हणतात, की जेव्हा त्यांनी बासरी वाजवायला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक व्यक्ती, अगदी प्राणी आणि पक्षीदेखील त्यांच्याकडे आकर्षिक होत असत. खरं तर, संगीत ही अशी शक्ती आहे, की ज्याद्वारे प्रत्येकजण प्रभावित होतो. त्याचवेळी, चांगले संगीत मानव आणि प्राणी दोघांनाही आकर्षित करते. सोशल मीडियावर समोर आलेला एक व्हिडिओ हे याचे ताजे उदाहरण आहे. अमेरिकेतील एका बॅन्जो वादकाचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये एक कोल्हा (Fox) बँजोच्या (Banjo) सुरांचा आनंद घेताना दिसत आहे. बँजो वादक अँडी थॉर्न कोलोरॅडोच्या टेकड्यांवर सूर्यास्ताच्या वेळी बँजो वाजवत होता, ते ऐकून तिथे असलेला एक कोल्हा मंत्रमुग्ध झाला. 55 सेकंदांची एक व्हिडिओ क्लिप सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही अँडी थॉर्न हिल्सवर बॅन्जो वाजवत असलेला पाहू शकता. इतक्यात, एक कोल्हा, बँजोचा सूर ऐकून त्याकडे आकर्षिला जातो.

इन्स्टाग्रामवर शेअर

काही वेळ ऐकून मात्र कोल्हा तिथून निघून जातो. हे पाहून अँडी बँजो वाजवणे थांबवतो. पण थोड्या वेळाने कोल्हा परत येतो आणि मग तिथेच बसतो. यानंतर अँडी पुन्हा बॅन्जो वाजवू लागतो. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर goodnewsdog नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शन लिहिले, “संगीताची शक्ती! हा व्हिडिओ लोकांना किती आवडला आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो, की चार दिवसांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ 1 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेकडो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

अद्भुत शक्ती

लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. लोक म्हणतात, की ही खरोखरच संगीताची शक्ती आहे, ज्याने एखाद्या प्राण्यालाही आपल्याकडे आणले आहे. एका यूझरने लिहिले आहे, की प्रत्येक कलेमध्ये एक शक्ती असते, जी प्रत्येकावर प्रभाव टाकते.’ त्याचवेळी, एका यूझरचे म्हणणे आहे, की चांगले संगीत शक्तिशाली चुंबकासारखे आहे. ज्याचे सूर प्रत्येकाला ओढून घेतात.

View this post on Instagram

A post shared by Good News Dog (@goodnewsdog)

आणखी वाचा : 

Viral : नाही मिळाले वही-पुस्तक म्हणून गाडीच्या काचेवर सुरू केला अभ्यास, पाहा हृदयस्पर्शी Photo

Viral : …अन् अचानक हवेत उडू लागते कार, Cyrus Dobre यानं शेअर केलेला हा flying car video पाहा

Video : ‘याद आ रहा है तेरा प्यार..’ वाळूशिल्प साकारत Sudarsan Pattnaik यांनी Bappi Lahiri यांना वाहिली श्रद्धांजली

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.