चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर कोल्हा, पायलटने पुन्हा विमान आकाशात उडवलं, 10 मिनिटं थरार!

सिंधुदुर्गातल्या चिपळूण विमानतळाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकताच लोकार्पण सोहळा पार पडला. लोकार्पण सोहळ्याला जेमतेम दहा दिवस उलटून जात नाहीत तोपर्यंत विमानतळावर मोठा थरार पाहायला मिळाला.

चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर कोल्हा, पायलटने पुन्हा विमान आकाशात उडवलं, 10 मिनिटं थरार!
चिपीच्या धावपट्टीवर कोल्हा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातल्या चिपळूण विमानतळाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकताच लोकार्पण सोहळा पार पडला. लोकार्पण सोहळ्याला जेमतेम दहा दिवस उलटून जात नाहीत तोपर्यंत विमानतळावर मोठा थरार पाहायला मिळाला. विमानतळाच्या धावपट्टीवर विमान लँड होणार एवढ्यातच धावपट्टीवर कोल्हा असल्याचं पायलटच्या लक्षात आलं. पुढची दहा मिनिट थरार पहायला मिळाला.

चिपीच्या धावपट्टीवर कोल्हा!

सध्या मुंबईवरुन सिंधुदुर्गला जाणाऱ्या विमान प्रवाशांची संख्या जास्त आहे. मुंबईवरुन दररोज सिंधुदुर्गसाठी विमान उड्डाणं होत आहेत. असंच मुंबईवरुन सिंधुदुर्ग हवाई अड्ड्यावर विमान उतरण्यासाठी सज्ज होतं. विमान लँड होणार होतं पण तेवढ्यात विमानाच्या पायलटच्या हे लक्षात आलं की धावपट्टीवर कोल्हा आला आहे. त्यामुळे पुढची दहा मिनिटं आकाशातच विमान घिरट्या घालत राहिलं.

धावपट्टीवर कोल्हा आहे, पायलटला कळताच विमान पुन्हा आकाशात उडवलं!

धावपट्टीवर कोल्हा आला आहे हे विमानाच्या पायलटच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ विमान आकाशात उडवलं आणि संबंधित यंत्रणेने या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढण्यास सांगितले. या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी विमान धावपट्टीवर उतरवण्यात आले.

सर्व बाजू संरक्षण भिंती, मग कोल्हा धावपट्टीवर कुठून आला?

विमानतळाच्या सर्व बाजू संरक्षण भिंतींनी बंदिस्त केल्या आहेत तरीही हा कोल्हा धावपट्टीवर कुठून आला असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पुढील चौकशी आता विमानतळ प्रशासन करत आहे.

(fox view at chipi airport runway sindhudurg maharashtra)

हे ही वाचा :

Sindhudurg Chipi Airport : विमानतळ सिंधुदुर्गाचं पण मग नाव ‘चिपी परुळे’ का? वाचा रंजक माहिती

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI