Sindhudurg Chipi Airport : विमानतळ सिंधुदुर्गाचं पण मग नाव ‘चिपी परुळे’ का? वाचा रंजक माहिती

विमानतळ मूर्त स्वरूपात येण्यासाठी भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे विमानतळाच्या नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याची रास्त मागणी स्थानिक नेत्यांनी आणि नागरिकांनी पूर्ण करून घेतली.

Sindhudurg Chipi Airport : विमानतळ सिंधुदुर्गाचं पण मग नाव 'चिपी परुळे' का? वाचा रंजक माहिती
विमानतळ सिंधुदूर्गाचं पण मग नाव 'चिपी परुळे' का? वाचा रंजक माहिती
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 7:38 AM

सिंधुदुर्ग : तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून सिंधुदुर्गातील नव्या ‘चिपी परुळे’ विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु होत आहे. सिंधुदुर्गवासीयांसाठी ही निश्चितच मोठी खुशखबर आहे. किंबहुना जिल्ह्याच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे. हे विमानतळ सिंधुदुर्गाची शान ठरणार आहे. याचवेळी विमानतळाच्या नावाची चर्चा तर होणारच ना! विमानतळ संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे, मग याला नाव ‘चिपी विमानतळ’ का असा प्रश्न सर्वांनाच पडू शकतो. मग यामागची पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेणे फार रंजक आहे. चला तर मग आपण या विमानतळावरून हवाई प्रवासाचा आनंद लुटण्याआधी नावाची रंजक माहिती जाणून घेऊया. (The airport is in Sindhudurg but why the name ‘Chipi Parule’, Read interesting information)

चिपी परुळे नाव का दिले?

आपल्याला माहीतच आहे, कुठलाही सार्वजनिक प्रकल्पाचे लोकार्पण करायचे असेल तर त्याचे आधी नामकरण केले जाते. अनेकदा मग याच नामकरणावरून वादाला तोंड फुटते. मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा’च्या नावाबद्दलही राजकरण झाले, तर मग सिधुदुर्ग जिल्ह्याच्या विमानतळाबाबतही नावाबाबत प्रश्न पडणे साहजिकच आहे. या विमानतळाचा उल्लेख चिपी परुळे विमानतळ असा केला जाणार आहे. यामागचे कारण म्हणजे हे विमानतळ उभे राहिलेय ते परुळे गावातील ‘चिपी वाडी’मध्ये. चिपी म्हणजे परुळे गावचाच एक भाग. पूर्वी चिपी हे एक पठार होते. आता याच भागातून विमानाचे उड्डाण होताना दिसणार आहे.

विमानतळ मूर्त स्वरूपात येण्यासाठी भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे विमानतळाच्या नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याची रास्त मागणी स्थानिक नेत्यांनी आणि नागरिकांनी पूर्ण करून घेतली. त्यामुळे विमानतळाबाबतचा आपलेपणा अधिक वाढला आहे. या विमानतळापासून तालुक्याचे ठिकाण असलेले कुडाळ 24 किमी आणि मालवण तालुका 12 किमी अंतरावर आहे. ‘कोकणच्या विकासाचे उड्डाण’ म्हणून विमानतळाकडे पाहिले जात आहे. या विकासाची सुरुवात ‘चिपी’ या छोट्याशा गावातून झाली आहे. त्यामुळे विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे असले तरी त्याला नाव ‘चिपी परुळे विमानतळ’ असे असेल.

आंतरराष्ट्रीय विमाने उतरणार

तब्बल 520 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. एमआयडीसीने हा प्रकल्प आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. या कंपनीला ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या 95 वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिला आहे. विमानतळाची धावपट्टी 2500 मीटरची असून भविष्यात तिचा विस्तार करण्यास पुरेशी जागा आहे. गर्दीच्या वेळेस अर्थात ‘पीक अवर्स’ला 200 प्रवाशांचे आगमन व तित्क्याच्या संख्येतील प्रवाशांचे प्रस्थान हाताळण्याची क्षमता या विमानतळाची आहे. अतिरिक्त बांधकाम न करता ही क्षमता प्रत्येकी 400 प्रवाशांपर्यंत वाढवता येणार आहे. हे विमानतळ देशांतर्गत अर्थात डोमेस्टिक प्रवाशांसाठी असले तरी यावर आंतरराष्ट्रीय चार्टर्ड विमाने उतरू शकणार आहेत. (The airport is in Sindhudurg but why the name ‘Chipi Parule’, Read interesting information)

मुंबईत शनिवारी फक्त महिलांसाठी लस, विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार

Video | धबधब्यावर खेळण्यात मग्न, अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटक गेले वाहून, थरारक व्हिडीओ व्हायरल

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.