AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | धबधब्यावर खेळण्यात मग्न, अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटक गेले वाहून, थरारक व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही पर्यटक धबधब्यामध्ये बसल्याचे दिसतेय. यामध्ये काही महिला तर काही पुरुषदेखील आहेत. ते आनंदाने पाण्यामध्ये खेळत आहेत. पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे काही महिला खडकावर मस्ती करत आहेत.

Video | धबधब्यावर खेळण्यात मग्न, अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटक गेले वाहून, थरारक व्हिडीओ व्हायरल
WATERFALL ACCIDENT VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 11:15 PM
Share

मुंबई : वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे निसर्गाचे चक्र बदलेले आहे. वादळ, वारा, अतिवृष्टी या गोष्टी तर नित्याच्याच झाल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे रोजच अनेक लोकांचा मृत्यू होतो. या अपघाताचे काही व्हिडीओ तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ चांगलाच थरराक आहे. या व्हिडीओमध्ये धबधब्याची पाणीपातळी अचानकपणे वाढल्यामुळे पर्यटक वाहून गेले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

व्हिडीओ अतिशय थरारक आणि अंगाचा थरकाप उडवणारा

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. तसेच ही घटना कधी घडली याचीसुद्धा निश्चित माहिती मिळालेली नाही. मात्र, हा व्हिडीओ अतिशय थरारक आणि अंगाचा थरकाप उडवणारा आहे. या व्हिडीओमध्ये पर्यटक पाण्याच्या प्रवाहात चक्क वाहून गेले आहेत. अचानकपणे पाण्याची पातळी वाढल्यामुळे हा अपघात झाला आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही पर्यटक धबधब्यामध्ये बसल्याचे दिसतेय. यामध्ये काही महिला तर काही पुरुषदेखील आहेत. ते आनंदाने पाण्यामध्ये खेळत आहेत. पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे काही महिला खडकावर मस्ती करत आहेत. मात्र, अचानकपणे या धबधब्यात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पाणी अतिशय जोरात आले आहे. पाण्याची पातळी अचानकपणे वाढल्यामुळे सगळे पर्यटक भेदरले आहेत. काही पर्यटकांनी पाणी वाढल्याचे दिसताच धबधब्यातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात काही महिला तसेच पुरुष यशस्वी झाले आहेत. मात्र, काही महिला पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या आहेत. पाण्याचा जोर मोठा असल्यामुळे काही करायच्या आत महिला पाण्यात वाहून गेल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ सध्या चागलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजले नसले तरी हे दृश्य अतिशय भीतीदायक आहे. हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी नदी, तलाव तसेच धबधब्याखााली जाताना काळजी घेण्याचे सांगितले आहे. तर काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ वेगवेगळ्या समाजमाध्यमावर शेअर केला आहे.

इतर बातम्या :

Video: शेअरिंग इज केअरिंग, मांजरींचा व्हिडीओ तुफान व्हायरल, लोक म्हणाले, हे माणूस कधी शिकणार?

Video: “बायकोने केळी आणायला सांगितली, नवरा गुलाब घेऊन आला,” पाहा बायकोचं क्युट रिएक्शन

Video: “एक झाड नाही पाडलं, शेकडो पक्ष्यांचं घर उद्ध्वस्त केलं”, नेटकरी व्हिडीओ पाहून संतापले!

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.