Video: “बायकोने केळी आणायला सांगितली, नवरा गुलाब घेऊन आला,” पाहा बायकोचं क्युट रिएक्शन

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात नवरा-बायकोमधील एक सुंदर प्रसंग दाखवण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या बायकोने केळी आणायला सांगितलं, पण त्याने आपल्या पत्नीला खूश करण्यासाठी एक भारी आयडिया केली, याचाच हा व्हिडीओ आहे.

Video: "बायकोने केळी आणायला सांगितली, नवरा गुलाब घेऊन आला," पाहा बायकोचं क्युट रिएक्शन
नवरा-बायकोच्या भांडणातही प्रेम दडलेलं असतं, असाच हा व्हिडीओ

नवरा-बायकोच्या भांडणातही प्रेम दडलेलं असतं, जुने जाणते सांगतात. तुम्ही अनेकदा जोडप्यांना कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर वाद घालताना पाहिलेलंच असेल. मुद्दा काहीही असो, नवरा-बायकोत कशावरुनही भांडण होऊ शकतं, आणि कधीही ते एक होऊ शकतात. म्हणूनच म्हणतात की नवरा-बायकोच्या भांडणात न पडलेलं बरं, कधी ते एक होतील हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात नवरा-बायकोमधील एक सुंदर प्रसंग दाखवण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या बायकोने केळी आणायला सांगितलं, पण त्याने आपल्या पत्नीला खूश करण्यासाठी एक भारी आयडिया केली, याचाच हा व्हिडीओ आहे. जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ( Husband surprised his wife with a rose her cute reaction goes viral on social media)

पाकिस्तानातील लाहौरचे कन्टेंट क्रिएटर बिलाल खान यांनी हा व्हिडीओ बनवला आहे. बिलाल खान यांच्या पत्नीने त्यांना बाजारातून केळी आणायला सांगितली, तेव्हा केळीसोबत ते गुलाबही घेऊन आहे. घराजवळ पोहचल्यावर ते पत्नीला कारजवळ बोलावतात. पत्नी जवळ येताच, घरातील साहित्याऐवजी ते गुलाब तिच्यासमोर करतात. हा गुलाब पाहुन पत्नी त्यांना म्हणते, तिकडे चुलीवर खिमा शिजवायला ठेवलाय, इकडं तुम्हाला काय प्रेम सुचतंय.

व्हिडीओ पाहा:

23 सप्टेंबर रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच धूमाकूळ घातलो आहे. म्हणूनच बर्‍याच लोकांनी ते स्वतःच्या सोशल मीडिया पेजवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

हेही पाहा:

Video: “एक झाड नाही पाडलं, शेकडो पक्ष्यांचं घर उद्ध्वस्त केलं”, नेटकरी व्हिडीओ पाहून संतापले!

Video | समुद्र किनाऱ्यावर टायरचा ब्लास्ट, मुलांनी वापरली मजेदार ट्रिक, व्हिडीओ व्हायरल

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI