AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | समुद्र किनाऱ्यावर टायरचा ब्लास्ट, मुलांनी वापरली मजेदार ट्रिक, व्हिडीओ व्हायरल

यामध्ये काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओ पाहून आपण हैराण होऊन जातो. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोन मुलं मस्ती करताना दिसत आहेत.

Video | समुद्र किनाऱ्यावर टायरचा ब्लास्ट, मुलांनी वापरली मजेदार ट्रिक, व्हिडीओ व्हायरल
ocean viral video
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 08, 2021 | 8:30 AM
Share

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते त्यांच्या पर्सनल अकाऊंटवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शेअर करतात. यामध्ये काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओ पाहून आपण हैराण होऊन जातो. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोन मुलं मस्ती करताना दिसत आहेत.

समुद्र खवळलेला, छिद्रातून पाण्याचे तुषार

गोयंका यांनी शेअर केलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. यामध्ये दोन मुले दिसत आहेत. ही मुलं एका समुद्र किनाऱ्यावर उभे आहेत. समुद्राच्या किनाऱ्यावर सोसाट्याचा वारा सुटल्याचं दिसतंय. तसेच समुद्रदेखील काही प्रमाणात खवळला आहे. अशा स्थितीत किनाऱ्यावर दोन मुले आहेत. ही मुले मस्ती करताना दिसत आहेत. समुद्राच्या किनाऱ्यावर एक मोठे छिद्र आहे. या छिद्रामध्ये पाण्याच्या लाटा जोराने आदळत आहेत. पाणी जोराने आदळल्यामुळे छिद्रातून तुषार उडत असल्याचे दिसत आहे. याच तुषारांसोबत खेळण्याची कल्पना व्हिडीओतील मुलांना सूचली आहे.

मुलांनी नेमकं काय केलं आहे ?

हर्ष गोयंका यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोन्ही मुलांच्या हातात मोठे टायर आहेत. समुद्राची लाट किनाऱ्याच्या छिद्राकडे येताच त्यांनी हातातील टायर्स त्या छिद्रामध्ये टाकले आहेत. नंतर पाण्याचा दबाव वाढल्यामुळे त्या छित्रातून मोठे तुषार निर्माण झाले आहेत. पाणी थेट आकाशात झेपावल्याचे आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो. याच पाण्यासोबत गाडीचे टायरसुद्धा हवेत उडाले आहेत. हा सर्व प्रसंग चकित करणारा आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. काही नेकऱ्यांनी तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच गोयंका यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओला काही लोकांनी शेअरसुद्धा केले आहे.

इतर बातम्या :

Video | नाद करायचा नाय ! चेन्नईच्या पठ्ठ्याने चालवली दोन चाकांवर रिक्षा, भलेभले स्टंटबाज गप्प, व्हिडीओ व्हायरल

Video | 14 फुटाच्या सापासोबत खेळ, गळ्यात घालून गावभर फिरणं महागात, क्षणात जीव गेला, नेमकं काय घडलं ?

Video: कंगव्याच्या आत भरला कॅचअप, नवऱ्याच्या प्रँकमुळे बायको चवताळली, व्हिडीओ तुफान व्हायरल

(children playing with tires on ocean edge funny video shared by harsh goenka)

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग