Video | 14 फुटाच्या सापासोबत खेळ, गळ्यात घालून गावभर फिरणं महागात, क्षणात जीव गेला, नेमकं काय घडलं ?

या व्हिडीओमध्ये एका माणूस चक्क सापासोबत खेळत आहे. मात्र, हा खेल त्याला चांगलाच महागात पडला आहे. सापाने दंश केल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | 14 फुटाच्या सापासोबत खेळ, गळ्यात घालून गावभर फिरणं महागात, क्षणात जीव गेला, नेमकं काय घडलं ?
SNAKE VIRAL VIDEO
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Oct 07, 2021 | 8:42 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओं चर्चेत येतात. यातील काही व्हिडीओ प्राणी आणि पक्ष्यांचे असतात. काही काही व्हिडीओ मजेदार असल्यामुळे आपण चकित होऊन जातो. तर काही व्हिडीओंना पाहिल्यामुळे आप प्रचंड घाबरतो. सध्या तर एक विचित्र व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका माणूस चक्क सापासोबत खेळत आहे. मात्र, हा खेळ त्याला चांगलाच महागात पडला आहे. सापाने दंश केल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शेतकऱ्याला अचानकपणे 14 फुटांचा साप दिसला

मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आसाम राज्यातील कछार जिल्ह्यातील विष्णूपूर येथील आहे. या गावात रघूनंदन भूमिज नावाचा 60 वर्षीय माणूस त्याच्या शेतात काम करत होता. यावेळी त्याच्यासमोर तब्बल 14 फूट लांबीचा एक साप आला. हा साप काही साधारण नव्हता. तर तो एक विषारी किंग कोब्रा होता. या सापाला भूमिज यांनी पकडलं आणि गावात आणलं.

साप घेऊन माणूस गावभर फिरला

त्यानंतर सापाला गावात घेऊन आल्यानंतर भूमिज शांत बसले नाहीत. त्यांनी सापाला आपल्या गळ्याभोवती गुंडाळून घेतले. तसेच त्यांनी सापाला घेऊन आपल्या कलाकारीचे गावभर प्रदर्शन केले. गावभर फिरत असल्यामुळे काही लोकांनी त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

पाहा व्हिडीओ :

सापाने दंश केल्यामुळे माणसाचा मृत्यू

दरम्यान, भूमिज यांच्या धाडसाला संपूर्ण गाव पाहत होते. मात्र, सापाला चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळे हे धाडस नंतर त्यांच्या अंगलट आलं. सापाने माणसाला अचानकपणे दंश केला. साप विषारी असल्यामुळे त्यांच्या पूर्ण अंगात विष चढले. घटना गावात पसल्यानंतर लोकांनी त्यांना शहरात रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी भूमिज यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे ज्या सापाने भूमिज यांचा जीव घेतला, त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नंतर रेस्क्यू करुन जंगलात सोडून दिले.

इतर बातम्या :

Video: कंगव्याच्या आत भरला कॅचअप, नवऱ्याच्या प्रँकमुळे बायको चवताळली, व्हिडीओ तुफान व्हायरल

Video: 2 चाकांवर 2 किलोमीटरपर्यंत व्हिली, चैन्नईच्या रिक्षा ड्रायव्हरचा कारनामा, व्हिडीओ गिनीज बुकच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट

Video: नवरीचा प्रश्न ऐकून नवरा बुचकळ्यात, बायकोला 7 वचन देणारा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल

(assam cachar man play with snake dies after snake bite video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें