Video: कंगव्याच्या आत भरला कॅचअप, नवऱ्याच्या प्रँकमुळे बायको चवताळली, व्हिडीओ तुफान व्हायरल

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या पार्टनरसोबत प्रँक करण्यासाठी केसांचा ब्रश उघडून त्यात भरपूर केचअप भरतो आणि मग तो पूर्वीसारखाच ठेवतो.

Video: कंगव्याच्या आत भरला कॅचअप, नवऱ्याच्या प्रँकमुळे बायको चवताळली, व्हिडीओ तुफान व्हायरल
नवऱ्याकडून बायकोचा प्रँक व्हिडीओ
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Oct 07, 2021 | 6:44 PM

सोशल मीडियावर प्रँक व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ लोकांना खूप आवडतात. त्यामुळेच प्रँक व्हिडीओ बनवण्याचा ट्रेंड आला आहे. त्यापैकी काही व्हिडीओ एवढे भन्नाट असतात की, ते पटापट शेअर केले जातात. लोक हे पाहु पोट धरुन हसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक प्रँक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या हसण्यावर ताबा ठेवता येणार नाही. ( Viral video of man did prank with his partner people will laugh after watching this)

व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती त्याच्या बायकोसोबत प्रँक करताना दिसत आहे. ही व्यक्ती त्याच्या पार्टनरसोबत असा काही प्रँक करतो, की तिचे केस खराब होतात, त्यामुळे त्याची पार्टनर त्याच्यावर खूप चिडते. आणि जोरजोरात ओरडू लागते. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडत आहे, शिवाय काही लोक असं करायला नको होतं, असं म्हणत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या पार्टनरसोबत प्रँक करण्यासाठी केसांचा ब्रश उघडून त्यात भरपूर केचअप भरतो आणि मग तो पूर्वीसारखाच ठेवतो. जेव्हा ही महिला आंघोळ करुन बाहेर येते, आणि केस ब्रश करते. तेव्हा त्यात ठेवलेला केचअप जमिनीवर पडतो. सुरुवातीला तिला त्याची ही खोड समजत नाही, पण जेव्हा ती तिच्या केसांना हात लावून पाहते, त्यातही केचअप लागलेला असतो. त्यानंतर ती प्रचंड संतापते.

पाहा व्हिडीओ:

हा मजेदार व्हिडिओ nicocapone.comedy नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला बातमी लिहिली जाईपर्यंत, तब्बल 36 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले होते. काही लोक या व्हिडिओवर खेद व्यक्त करत आहेत, तर काही लोक त्यावर हसत आहेत.

हेही पाहा:

Video: नवरीचा प्रश्न ऐकून नवरा बुचकळ्यात, बायकोला 7 वचन देणारा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल

Video: मेव्हणीने नवरीला भेटू देण्यासाठी तब्बल 74 हजार मागितले, नवरा थेट छतावर चढून नवरीजवळ पोहचला!

 

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें