Video | नाद करायचा नाय ! चेन्नईच्या पठ्ठ्याने चालवली दोन चाकांवर रिक्षा, भलेभले स्टंटबाज गप्प, व्हिडीओ व्हायरल

चेन्नई येथील रिक्षाचालकाने अजब प्रकारे रिक्षा चालवून दाखवली आहे. लोक तीन चाकांवर रिक्षा चालवतात. मात्र, मणी यांनी चक्क दोन चाकांवर रिक्षा चावलून दाखवली आहे.

Video | नाद करायचा नाय ! चेन्नईच्या पठ्ठ्याने चालवली दोन चाकांवर रिक्षा, भलेभले स्टंटबाज गप्प, व्हिडीओ व्हायरल
AUTO RICKSHAW
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Oct 07, 2021 | 9:21 PM

मुंबई : आपल्या देशात टॅलेन्टची कमी नाही. कोणामध्ये काय कलाकारी दडलेली असेल हे सांगता येत नाही. काही लोक तर अतिशय वेगळी आणि विचित्र अशी कलाकारी करतात की आपण थक्क होऊ जातो. काही लोक तर चांगलेच स्टंटबाज असतात. त्यांचे स्टंट पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. सध्या मात्र, एक आगळावेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चेन्नईच्या एका रिक्षाचालकाने चकित करुन सोडणारा कारनामा केला आहे.

चक्क दोन चाकांवर चालवली रिक्षा

व्हिडीओमध्ये दिसणारा रिक्षाचालक मूळचा चेन्नईचा आहे. ही घटना जुनी असली तरी हा व्हिडीओ मात्र पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जगतीश मणी (Jagathish Mani) या चेन्नई येथील रिक्षाचालकाने एक अजब प्रकारे रिक्षा चालवून दाखवली आहे. लोक तीन चाकांवर रिक्षा चालवतात. मात्र, मणी यांनी चक्क दोन चाकांवर रिक्षा चालवली आहे.

विशेष म्हणजे हा वर्ल्ड रेकॉर्ड जुना असला तरी गीनिज वर्ल्ड रेकॉर्डतर्फे  वेगवेगळे व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केले जातात. मणी यांचा व्हिडीओदखील त्यांनी पुन्हा एकदा अपलोड केल्यामुळे त्याची नव्याने चर्चा होत आहे.

पाहा व्हिडीओ :

जगतीश मणी यांच्या नावावर कोणता विक्रम आहे ?

जगतीश मणी हे मूळचे चेन्नई येथील आहेत. ते रिक्षा चालवतात. सामान्यत: लोक रिक्षा तीन चाकांवर चालवतात. मणी यांनी मात्र त्यांची रिक्षा फक्त दोन चाकांवर चालवली आहे. तेही तब्बल दोन किलोमीटरपेक्षा जास्त अंतर त्यांनी दोन चाकांवर रिक्षा चालवली आहे. त्यांच्या या विक्रमाची गीनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

दरम्यान, हा व्हिडीओ नव्याने चर्चेत आला आहे. नेटकरी या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ स्वत:च्या अकाऊंटवर उत्स्फूर्तपणे शेअरदेखील केला आहे.

इतर बातम्या :

Video | 14 फुटाच्या सापासोबत खेळ, गळ्यात घालून गावभर फिरणं महागात, क्षणात जीव गेला, नेमकं काय घडलं ?

Video: कंगव्याच्या आत भरला कॅचअप, नवऱ्याच्या प्रँकमुळे बायको चवताळली, व्हिडीओ तुफान व्हायरल

Video: प्लास्टिकच्या बाटलीत कुत्र्याचं तोंड फसलं, सायकलस्वारांनी कुत्र्याचा जीव वाचवला, व्हिडीओ व्हायरल

(chennai rickshaw driver Jagathish Mani drove rickshaw on two wheeler record noted by guinness book of world record)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें