Video: महाकाय किंग कोब्राला आंघोळ घालणारा सर्पमित्र, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणूस एका विशाल कोब्राला बादलीने आंघोळ घालताना दिसत आहे. गंमत म्हणजे सापसुद्धा त्याचा आनंद घेताना दिसतो.

Video: महाकाय किंग कोब्राला आंघोळ घालणारा सर्पमित्र, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का
कोब्राच्या फन्यावर पाणी टाकल्यानंतरही तो शांतच राहतो, कुठलाही हल्ला करत नाही.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Oct 06, 2021 | 6:50 PM

सध्या सोशल मीडियावर एका सापाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणूस एका विशाल कोब्राला बादलीने आंघोळ घालताना दिसत आहे. गंमत म्हणजे सापसुद्धा त्याचा आनंद घेताना दिसतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणालाही आश्चर्य वाटेल. तुमच्या माहितीसाठी, हा व्हिडिओ जुना आहे, पण, इन्स्टाग्रामवर तो पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना धक्का बसला आहे. लोक यावर सतत कमेंट्स करत आहेत. (Giant King Cobra Bath video goes viral on internet left netizens amazed)

व्हायरल व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता की, एक माणूस घराबाहेर एक विशाल कोब्रा सोबत आहे. तो कोब्राजवळ जातो. बाजूलाच पडलेल्या बादलीत पाणी भरुन घेतो, आणि या कोब्राच्या फन्यावर टाकतो. हा कोब्रा उंच फना काढून त्याच्याकडे पाहात आहे, हे पाहिल्यानंतर कुणालाही भिती वाटली असती, मात्र हा सर्पमित्र अगदी शांतपणे हे सगळं करत आहे. विशेष म्हणजे कोब्राच्या फन्यावर पाणी टाकल्यानंतरही तो शांतच राहतो, कुठलाही हल्ला करत नाही. लोक या सर्पमित्राला केरळचे प्रसिद्ध सर्प तज्ञ वावा सुरेश सांगत आहेत. मात्र, याचा कुठलाही पुरावा नाही.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच कुणाच्याही काळजाचा थरकाप उडेल. पण ज्या पद्धतीने ही व्यक्ती कोब्राला न घाबरता आंघोळ घालत आहे, त्याच्या धाडसाचे कौतुक केलं पाहिजे. हा व्हिडिओ सचिन मिश्रा नावाच्या इन्स्टाग्राम युजरने helicopter_yatra नावाच्या पेजवरुन शेअर केला आहे.

हा व्हिडिओ 23 सप्टेंबरला शेअर केल्यापासून आतापर्यंत 33 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केला आहे. हेच नाही तर त्यावर कमेंट्सचा पाऊस पला आहे. बहुतेक लोक आश्चर्यची प्रतिक्रीया देत आहेत. काही लोक भोलेबाबा की जय म्हणत प्रतिक्रिया देत आहेत.

हेही पाहा:

Video: खारुताई आणि सापाची लढाई, खारुताईने सापाला कुरतडून कुरतडून खाल्लं, व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Video: 2 वर्षांच्या चिमुरड्याने पकडला भलामोठा साप, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, हा तर टारझन वाटतो!

 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें