AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशभरात ओला, उबर आणि रॅपिडो चालकांचा संप, प्रवाशांचे होणार हाल

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये युनियनने स्पष्ट केले आहे की मोटर व्हीईकल एग्रीगेटर गाईडलाईन्स 2025 लागू झाल्यानंतरही एग्रीगेटर कंपन्या मनमानी पद्धतीने भाडे निश्चित करत आहेत. त्यामुळे चालकांचा कमिशन घटले आहे.

देशभरात ओला, उबर आणि रॅपिडो चालकांचा संप, प्रवाशांचे होणार हाल
ola uber strike
| Updated on: Feb 07, 2026 | 12:19 PM
Share

Ola Uber Rapido Drivers Strike: शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी तुम्ही घराबाहेर कामानिमित्त ओला-उबर किंवा रॅपिडो बुक करणार असाल तर सावध रहा. कारण देशभरातील ओला-उबर चालक संपावर जाणार आहेत. हा संप सहा तासांचा असणार आहे. देशभरात महानगरांसह अनेक भागातील ओला-उबर चालक या संपात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे या संपाची झळ सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.

देशभरातील अ‍ॅप-आधारित वाहतूक कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन (TGPWU) ने हा संप पुकारला आहे. ७ फेब्रुवारी रोजी अ‍ॅप-आधारित चालक सहा तासांच्या संपावर जातील असे संघटनेने म्हटले आहे. मोटार वाहन अ‍ॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे २०२५ लागू असूनही याचे पालन न करता अ‍ॅग्रीगेटर कंपन्या मनमानीपणे भाडे ठरवत आहेत, त्यामुळे ओला-उबर चालकांचे कमिशन कमी झाले आहे. त्यामुळे चालकांचे उत्पन्न आणि रोजगार दोन्ही धोक्यात आले आहेत.

सरकारने किमान भाडे निश्चित करावे ज्यामुळे चालकांना प्रति राईड निश्चित आणि सन्मानजनक उत्पन्न मिळू शकेल असे युनियनने म्हटले आहे. तसेच व्यावसायिक राईड्ससाठी खाजगी वाहनांच्या वापरावर कठोर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. खाजगी वाहनांचा वापर करणाऱ्या व्यावसायिक राईड्स अनैतिक स्पर्धा निर्माण करत आहेत, ज्यामुळे परवानाधारक आणि कायद्याचे पालन करणाऱ्या चालकांचे उत्पन्न आणि रोजगार दोन्ही धोक्यात आले आहेत असेही युनियनने म्हटले आहे.

युनियनला काय भीती ?

किमान भाड्याची तरतूद नसल्यामुळे चालकांचे उत्पन्न सातत्याने कमी होत आहे, ज्यामुळे त्यांची आर्थिक संकट वाढत आहे. अनेक वाहनचालकांसाठी, हे त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे आणि वाढत्या खर्च, इंधनाच्या किमती आणि कमी भाडे यामुळे गुजराण होणे कठीण झाले आहे. देशभरातील अॅप-आधारित वाहतूक कामगारांना संपात सामील होण्याचे आवाहन युनियनने केले आहे.या संपाचा प्रवाशांच्यावर परिणाम होऊ शकतो, म्हणून लोकांनी उद्या वाहतुकीच्या पर्यायी साधनांची आगाऊ व्यवस्था करावी किंवा त्यांच्या प्रवासाच्या योजनांमध्ये बदल करावा असा सल्ला दिला जात आहे.

Follow Us
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप.
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?.
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात.
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.