AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs USA : यूएसए विरुद्ध या खेळाडूला संधी नाही म्हणजे नाही;डच्चूच मिळणार!

India Probable Playing 11 Against USA T20i WC 2026 : टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत यूएसए विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. त्या सामन्यात एका खेळाडूला संधी मिळणार नाही, हे जवळपास 99 टक्के निश्चित आहे.

IND vs USA : यूएसए विरुद्ध या खेळाडूला संधी नाही म्हणजे नाही;डच्चूच मिळणार!
Sanju Samson Suryakumar Yadav Team IndiaImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 07, 2026 | 1:24 AM
Share

टीम इंडियाचा विकेटकीपर आणि ओपनर बॅट्समन संजू सॅमसन न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेतील सर्व सामन्यात सपशेल अपयशी ठरला. संजूला अपयशी ठरल्यानंतरही विश्वास ठेवून सातत्याने संधी देण्यात आली. मात्र संजूने या संधीची माती केली. संजूने न्यूझीलंड विरूद्धच्या पाचही सामन्यात निराशा केली. संजूला त्या मालिकेत काहीही खास असं करता आलं नाही. त्यामुळे संजूला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत निवड होऊनही प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.  टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा 7 फेब्रुवारीला यूएसए विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात संजूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळण्याची काडीमात्र शक्यता नाही. संजूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी न मिळण्यामागे 3 कारणं आहेत.

संजूची फ्लॉप कामगिरी, इशानचं कडक कमबॅक

संजूला संधी न मिळण्याच्या शक्यतेमागे पहिलं प्रमुख कारण म्हणजे त्याची स्वत:ची कामगिरी. संजू भारताच्या अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. मात्र संजूला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तसेच विकेटकीपर इशान किशन याने वर्ल्ड कपआधी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या शेवटच्या मालिकेत तडाखेदार खेळी केली होती. इशानने निर्णायक क्षणी केलेलं कमबॅक आणि त्याचं विकेटकीपर असणं हे त्याच्या पथ्यावर पडलंय. इशानने यासह वर्ल्ड कपसाठी प्लेइंग ईलेव्हनमधील आपला दावा मजबूत केला. विशेष म्हणजे इशानला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात बॅकअप विकेटकीपर म्हणून संधी देण्यात आली होती. मात्र संजूने अशी  काही कामगिरी केली की इशान बॅकअपचा प्रमुख विकेटकीपर झालाय, असं चित्र आता पाहायला मिळत आहे.

तिलक वर्मा फिट

तसेच टीम इंडियाचा मिडल ऑर्डरमधील प्रमुख फलंदाज तिलक वर्मा याला दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20i मालिकेला मुकावं लागलं. त्यामुळे तिलकच्या जागी श्रेयस अय्यर याला संधी देण्यात आली. मात्र प्लेइंग ईलेव्हनमध्ये श्रेयसऐवजी इशानला संधी देण्यात आली. तसेच संजूलाही कायम ठेवण्यात आलं. इशानसाठी न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत दुसऱ्या  खेळाडूंना बाहेर करण्यात आलं. मात्र त्यानंतरही संजूला काही धावा करता आल्या नाहीत.

आता तिलक वर्माचं कमबॅक झालंय. तिलकने दुखापतीवर मात केलीय. तसेच तिलक वर्ल्ड कप स्पर्धेआधी सराव सामनेही खेळलाय. त्यामुळे तिलक वर्माचं यूएसए विरुद्ध खेळणं जवळपास निश्चित आहे. तसेच उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या इशानचा संजूच्या जागी समावेश केला जाणार असल्याचं निश्चित म्हटलं जात आहे. इशानने सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अभिषेक शर्मा याच्यासह ओपनिंग केली.

तसेच सराव सामन्यात प्लेइंग ईलेव्हनचं बंधन नसतं.  विकेट्सची मर्यादा ही 10 इतकीच असते. मात्र जास्तीत जास्त फलंदाजांचा सरावा व्हावा यासाठी प्लेइंग ईलेव्हनची अट ठेवलेली नसते. मात्र त्या सराव सामन्यात संजूला बॅटिंगसाठी पाठवण्यात आलं नाही. तसेच संजू असतानाही न्यूझीलंड विरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात इशानला ऐनवेळेस विकेटकीपिंगची संधी देण्यात आली.  संजूला डच्चू मिळण्याचे हे 2 संकेत आहेत.

Follow Us
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...