रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कचा वाद पेटला; संगीता तिवारी म्हणाल्या, ‘साडी नेसायला…
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्वतःचे नाव, फोटो आणि वैयक्तिक शैलीचे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन केल्याच्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. तिवारी यांनी चाकणकरांना "डोकं फिरलंय का?" असा संतप्त सवाल विचारत, लोकांना अमिताभ बच्चन समजता का अशी विचारणा केली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या नावाचे, फोटोचे आणि वैयक्तिक शैलीचे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन केल्याची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या कथित निर्णयामुळे राजकीय नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संगीता तिवारी यांनी पुण्याहून बोलताना म्हटले की, रुपाली चाकणकर यांचे डोकं फिरले आहे का, असा प्रश्न त्यांना पडतो आहे.
चाकणकर यांनी आपली साडी नेसण्याची पद्धत, राहणीमान याला ट्रेडमार्क केले असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, “आम्ही साडी नेसतो म्हणजे काय तुमची कॉपी करतो का? गळ्यात मंगळसूत्र घालणाऱ्या बायका काय तुमची कॉपी करतात का? तुम्ही काही अमिताभ बच्चन आहात का की लोकांनी तुमची कॉपी करावी?” अशा संतप्त शब्दात त्यांनी चाकणकरांवर हल्ला चढवला. या प्रकरणी कितीही प्रयत्न केले तरी हा पिक्चर लागणारच असे म्हणत, रुपाली चाकणकरांना सामान्य माणूस म्हणूनच राहावे असा सल्ला संगीता तिवारी यांनी दिला आहे. उशिरा अक्कल आल्यासारखे आणि डोक्यावर परिणाम झाल्यासारखे वागू नका, तुम्ही अमिताभ बच्चन नाही, तुमची कोणी कॉपी करणार नाही, असे खडे बोल तिवारी यांनी सुनावले आहेत.
Published on: Nov 15, 2026 02:18 PM
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कचा वाद पेटला; संगीता तिवारी म्हणाल्या...
अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पोलिसांची कारवाई? काँग्रेस कार्यकर्ते
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची उपस्थिती; आदिवासी बांधव...
रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय..

