AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: प्लास्टिकच्या बाटलीत कुत्र्याचं तोंड फसलं, सायकलस्वारांनी कुत्र्याचा जीव वाचवला, व्हिडीओ व्हायरल

या कुत्र्याच्या डोक्यात प्लास्टिकची बाटली अडकली. ज्यामुळे कुत्र्याचा जीव जाण्याची वेळ आली. पण सुदैवाने काही सायकलस्वारांना हा कुत्रा दिसला, आणि त्यांनी त्याची या बाटलीतून सुटका केली.

Video: प्लास्टिकच्या बाटलीत कुत्र्याचं तोंड फसलं, सायकलस्वारांनी कुत्र्याचा जीव वाचवला, व्हिडीओ व्हायरल
तिन्ही सायकलस्वार त्याच्याजवळ जातात. आणि ती अकडलेली बाटली कापून त्याची सुटका करतात.
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 6:25 PM
Share

जगभरात अजूनही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे केवळ माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही त्रास सहन करावा लागतो. बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की, अनेक वेळा प्लास्टिक प्राण्यांसाठी मोठ्या अचडणीचं कारण ठरतं. असंच काहीसं घडलं एका कुत्र्यासोबत. या कुत्र्याच्या डोक्यात प्लास्टिकची बाटली अडकली. ज्यामुळे कुत्र्याचा जीव जाण्याची वेळ आली. पण सुदैवाने काही सायकलस्वारांना हा कुत्रा दिसला, आणि त्यांनी त्याची या बाटलीतून सुटका केली. (Cyclists free dogs head from plastic bottle watch this viral video)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये, काही सायकलस्वार फिरायला बाहेर असल्याचं दिसतं. पण या दरम्यान त्यांना वाटेत एक कुत्रा दिसतो, ज्याचं डोकं एका कोल्डड्रिंकच्या बाटलीत अडकलेलं असतं. कुत्र्याचा जीव धोक्यात असल्याचे पाहून तिन्ही सायकलस्वार त्याच्याजवळ जातात. आणि ती अकडलेली बाटली कापून त्याची सुटका करतात. डोक्यातून बाटली निघाल्यानंतर कुत्र्याला खूप बरं वाटतं.

व्हिडीओ पाहा:

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण व्हिडिओमधल्या तिघांचंही कौतुक करत आहे. एका युजरने मानवी चुकांमुळे कुत्र्याचे आयुष्य धोक्यात आलं, पण सुदैवानं या तिघांनी कुत्र्याला वाचवलं असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने सांगितले की, जर हे तिघे वेळेवर पोहोचले नसते, तर कुत्र्याचा जीव वाचला नसता.

हा व्हिडिओ Mack & Becky Comedy ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. बातमी लिहीपर्यंत हा व्हिडिओ 5 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक लोक त्या लोकांचे कौतुक करत आहेत, ज्यांनी रस्त्यात थांबून कुत्र्याला वाचवलं.

हेही पाहा:

Video: कुत्र्यापासून वाचण्यासाठी भाऊ थेट कारच्या टपावर, नेटकरी म्हणाले, “याच्यावर चिडताही येणार नाही!”

Video: एकमेकींशी खेळणाऱ्या मांजरींचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, इतक्या गोंडस मांजरी आम्ही नाही पाहिल्या!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.