AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: कुत्र्यापासून वाचण्यासाठी भाऊ थेट कारच्या टपावर, नेटकरी म्हणाले, “याच्यावर चिडताही येणार नाही!”

काही जण हुशारी दाखवून एखाद्या उंचजागी चढतात. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एकाच्या मागे कुत्रं लागतं, तेव्हा तो त्याचं सगळं देहभान विसरुन जोरात पळतो, आणि थेट कारवर चढतो.

Video: कुत्र्यापासून वाचण्यासाठी भाऊ थेट कारच्या टपावर, नेटकरी म्हणाले, याच्यावर चिडताही येणार नाही!
कुत्र्यापासून पळतानाचा व्हिडीओ व्हायरल
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 10:57 AM
Share

जेव्हा कुत्रं मागं लागतं तेव्हा माणूस उसेन बोल्टहून जास्त जोरात पळतो, त्याच्या अंगात एक वेगळीच शक्ती संचारते, आणि जीव वाचवण्यासाठी तो जीवाच्या आकांताने पळतो. काहीजण हिंमत करुन जागेवरच थांबून दगड उचलतात, आणि कुत्र्याला पळवतात, मात्र काही जण हुशारी दाखवून एखाद्या उंचजागी चढतात. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एकाच्या मागे कुत्रं लागतं, तेव्हा तो त्याचं सगळं देहभान विसरुन जोरात पळतो, आणि थेट कारवर चढतो. ( To escape from the dog, a man climbed directly on top of the car. Viral video )

36 सेकंदाच्या या व्हिडीओत एक माणूस रस्त्यावरुन चालत येताना दिसत आहे. तितक्यात एका कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतो. कुत्र भुंकताना पाहून हा व्यक्ती जोरात पळू लागतो, कुत्र्यालाही हेच हवं असतं, कुत्रंही या व्यक्तीच्या मागे जोरात पळत येतं. या व्यक्तीच्या पाठीला आणि हातात ट्रॅव्हल बॅग आहेत, म्हणजे कुठूनतरी प्रवासावरुन आला आहे आणि या भागात नवीन असण्याची दाट शक्यता आहे. कुत्र्याला पाहून हा व्यक्तीची आणखी जोरात पळू लागतो, कुत्रा त्याला पकडेल असं वाटतं, पण तितक्यात या व्यक्तीला पार्किंगमध्ये उभी असलेली कार दिसते. हे पाहताच कुठलाही विचार न करता हा व्यक्ती कारच्या टपावर चढतो, आणि तिथं आसरा घेतो. हा व्यक्ती कारवर चढल्याचं पाहून हे कुत्रं त्याचा पिछा सोडतं, आणि पुन्हा घराकडे निघून जातं.

पाहा व्हिडीओ:

कुत्रं गेल्याचं पाहून हा व्यक्ती कारवरुन खाली उतरतो, पण तितक्यात कारमध्ये बसलेली कारची मालकीन काच खाली करते आणि त्याच्यावर ओरडते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. @Idontknowyoucuh या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहण्यात आलं आहे की, या भावावर चिडताही येणार नाही. बातमी लिहली जाईपर्यंत हा व्हिडीओ तब्बल 31 लाख लोकांनी पाहिला होता. 1 लाख 35 लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तर जवळपास 30 हजार लोकांनी हा रिट्वीट केला आहे.

या व्हिडीओवर काही भन्नाट कमेंट्स आणि मिम्सची तयार करण्यात आले आहेत.

हेही पाहा:

Viral Video : साप आणि खारुताईमध्ये जबरदस्त लढाई, कुरतडून कुरतडून खाल्ले सापाला

Video: महाकाय किंग कोब्राला आंघोळ घालणारा सर्पमित्र, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का

 

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.