Video: “एक झाड नाही पाडलं, शेकडो पक्ष्यांचं घर उद्ध्वस्त केलं”, नेटकरी व्हिडीओ पाहून संतापले!

स्वार्थी माणसाला अजिबात समजत नाही की ते त्यांच्या स्वार्थामुळे पर्यावरणाचा समतोल ढासाळतो आहे. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात माणसाच्या स्वार्थी आणि निर्दयीपणाचं दर्शन घडतं.

Video: "एक झाड नाही पाडलं, शेकडो पक्ष्यांचं घर उद्ध्वस्त केलं", नेटकरी व्हिडीओ पाहून संतापले!
एक जेसीबी मशीन येतं आणि झाड पाडतं. त्याच झाडावर अनेक पक्ष्यांची घरं आहेत.

झाडांना ईश्वराची देणगी म्हटलं जातं, ज्यातून माणसाला आवश्यक असलेलं सर्वकाही मिळतं. झाडं ही केवळ माणसांसाठीच नाही तर प्राणी आणि पक्ष्यांसाठी देखील तितकीच महत्वाची आहेत. यामुळेच पृथ्वीचा समतोल राखला जातो. एक काळ होता जेव्हा आपली पृथ्वी जंगलांनी भरलेली होती, परंतु आज माणसाच्या स्वार्थामुळे बोटावर मोजण्याइतकीच जंगलं अस्तित्वात आहेत. स्वार्थी माणसाला अजिबात समजत नाही की ते त्यांच्या स्वार्थामुळे पर्यावरणाचा समतोल ढासाळतो आहे. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात माणसाच्या स्वार्थी आणि निर्दयीपणाचं दर्शन घडतं. (Viral video of man who destroyed hundreds of birds home people got angry after watching this)

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक जेसीबी मशीन येतं आणि झाड पाडतं. त्याच झाडावर अनेक पक्ष्यांची घरं आहेत. झाड पडताना पाहुन पक्षी उडून जातात, पण पिल्लं त्यातच मेली असणार.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडिओ वन अधिकारी सुधा रमण यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओसह कॅप्शन असे लिहिले आहे की ‘जर ही क्लिप पाहून आपल्याला फारसा त्रास देत नसेल, तर तुमचं काहीच होऊ शकत नाही. घाईघाईने निर्णय घेऊ नका, आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का ते तपासा. आहे ते झाड जगवणं हे नवीन झाडाचं रोप लावण्याहून कित्येक हजार पटीने चांगलं आहे.

हा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेक लोक संतापले आहेत. हेच कारण आहे की बर्‍याच लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एकने लिहिले, ‘या प्रकारचा व्हिडिओ हृदय पिळवटून टाकतो.’ तर अनेकांनी आपल्या कमेंट्समधून राग व्यक्त केला आहे. या व्हिडीओला 19 हजाराहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

हेही पाहा:

Video | नुकत्याच जन्मलेल्या हत्तीच्या पिल्लाचं जंगी स्वागत, जंगलातील हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

VIDEO | अस्वलाला कॅमेरा सापडला आणि त्याने त्याच्यासोबत जे केलं ते पाहून नेटकरी आवाक

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI