AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: पाणी पिणाऱ्या सिंहाची कासवाने छेड काढली, त्यानंतर जे झालं, ते पाहून नेटकरी आवाक!

एक सिंह नदीकिनारी पाणी पिताना दिसतो आहे. सिंह अगदी आरामात आपली तहान भागवत आहे. तेवढ्यात एक कासव पाण्यातून पोहत-पोहत सिंहाजवळ पोहचतं

Video: पाणी पिणाऱ्या सिंहाची कासवाने छेड काढली, त्यानंतर जे झालं, ते पाहून नेटकरी आवाक!
कासव सिंहाच्या तोंडाजवळ येताच सिंह पाणी पिण्याचं थांबवतो
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 5:51 PM
Share

जगात रोज अशा अनोख्या गोष्टी घडत असतात, ज्या पाहिल्यानंतर आपल्याला डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. निसर्गात तर अशा अद्भूत घटना (Weird Moments Captured On Camera) नेहमी घडत असतात, ज्या पाहिल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकीत होता. यातीलच काही घटना कधी-कधी कॅमेऱ्यात कैद होतात. आणि याच छोट्या छोट्या घटनांचे व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. कदाचित त्या घटना कॅमेऱ्यात कैद झाल्या नसत्या तर कुणी सांगूनही त्यावर विश्वास ठेवला नसता. ( viral video The water-drinking lion’s teased by tortoise . Frightened by the turtle, the lion left)

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक सिंह नदीकिनारी पाणी पिताना दिसतो आहे. सिंह अगदी आरामात आपली तहान भागवत आहे. तेवढ्यात एक कासव पाण्यातून पोहत-पोहत सिंहाजवळ पोहचतं, आता तुम्ही विचार कराल, हा कशाला स्वत:हून इथं जीव द्यायला आला. आता सिंह त्याचा कोथळा बाहेर काढणार. पण निसर्गात आपण विचार करतो असं नेहमी होत नसतं. हे कासव सिंहाच्या तोंडाजवळ येताच सिंह पाणी पिण्याचं थांबवतो आणि दुसऱ्या बाजूला पाणी पिण्यास सुरुवात करतो. त्यानंतर हे खोडकर कासव पुन्हा एकदा त्याच्या तोंडाजवळ जातं, हे पाहून सिंह त्या ठिकाणाहून बाजूला होऊन जातो. या छोटुशा कासवाने अवाढव्या सिंहाला पाणी पिण्यापासून लांब करुनच दाखवलं. जर या घटनेचा व्हिडीओ समोर आला नसता, तर ही घटना सांगूनही कुणी विश्वास ठेवला नसता.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडीओ IFS ऑफिसर सुशांता नंदा यांनी आपल्या अकाऊंटवरुन ट्विट केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं आहे की, बूस्टर डोस घेतल्यानंतर एवढी ताकद येते. म्हणजेच बूस्टर डोस घेतल्यानंतर कोरोना कितीही भयानक रुप घेऊन आला, तरी तो तुमच्यापासून लांबच पळेल. आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो वेळेस पाहिला गेला आहे. लोकही यावर मजेदार कमेंट्स करत आहेत.

हेही पाहा:

अतिरेक्यांच्या गोळीबारात आईचा मृत्यू, आता ज्या रेंजरने वाचवलं, त्याच्याच कुशीत जीव सोडला, रवांडाच्या प्रसिद्ध गोरील्लाचा मृत्यू

Know This: अशी आई, जी बाळाला दूध पाजते आणि मरते, बाळांचं पोट भरण्यासाठी मृत्यूला कवटाळणारी आई

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.